Tarun Bharat

प्रमोद भगत, सुकांत कदम उपांत्य फेरीत

दुहेरी, मिश्र दुहेरीतही भगतची आगेकूच

वृत्तसंस्था/ दुबई

पॅराबॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असणाऱया भारताच्या प्रमोद भगतने तसेच जागतिक पाचव्या मानांकित सुकांत कदमने येथे सुरू असलेल्या दुबई पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.

एसएल 3 विभागात भगतने मानांकनाला साजेसे शानदार प्रदर्शन करीत इंडेनेशियाच्या उकुन रुकेन्डीवर 44 मिनिटांच्या खेळात 21-16, 21-13 अशी मात केली. एसएल 3 विभागातील खेळाडू एका किंवा दोन्ही पायांनी अधू असतात आणि त्यांना चालताना किंवा पळताना तोल सांभाळता येत नाही. भगतची उपांत्य लढत मलेशियाच्या मुहम्मद हुझैरी अब्दुल मलीकशी होणार आहे. भगतने पुरुषांच्या दुहेरीतही उपांत्य फेरी गाठली आहे. दीप रंजन बिसोईसमवेत तो दुहेरीत खेळत आहे. विशेष म्हणजे प्रमोद भगतने मिश्र दुहेरीतही पलक कोहलीसमवेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

एसएल 4 विभागातील खेळाडूंच्या एका किंवा दोन्ही पायांत व्यंग असते आणि चालताना किंवा पळताना त्यांना एसएल 3 मधील खेळाडूंपेक्षा बऱयापैकी तोल सांभाळता येतो. सुकांत कदमने या विभागात उपांत्य फेरी गाठताना मलेशियाच्या मुहम्मद नॉरहिल्मी मोहम्मद झैनुदिनवर 21-17, 21-8 अशी सहज मात केली. कदमची पुढील लढत जर्मनीच्या मार्सेल ऍडमशी होणार आहे.

Related Stories

अर्सेनलकडे एफए फुटबॉल चषक

Patil_p

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार आमचाच

datta jadhav

क्रोएशियाला हरवून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

Patil_p

धोनी वनडेतून लवकरच निवृत्त होईल

Patil_p

टोकियो ऑलिम्पिकसाठी दीक्षा डागरला संधी

Amit Kulkarni

अंजुम मोदगिलला रौप्यपदक

Patil_p