बेळगाव : प्रयत्न या महिला संस्थेतर्फे महानगरपालिका संचालित निराधार केंद्राला अन्नधान्याची मदत करण्यात आली. या ठिकाणी 32 नागरिक रहात असून प्रयत्नच्या सदस्यांनी 16 हजारहून अधिक किमतीचे धान्य वितरित केले. यावेळी अध्यक्षा शांता आचार्य, श्वेता बिजापुरे, पद्मा वेर्णेकर, सुनीता व वर्धा भट्ट आदी उपस्थित होते.

