Tarun Bharat

प्रवाशाला रेल्वे पोलीसांनी बाहेर काढले मृत्यूच्या दाढेतून

Advertisements

वास्को रेल्वे स्थानकावरील थरार

प्रतिनिधी/ बेळगाव

नैऋत्य रेल्वेच्या वास्को द गामा रेल्वे स्थानकावर धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्ना एक प्रवासी रेल्वे सोबत फरफटत गेला. प्लॅटफॉर्म व रेल्वे यांच्यामध्ये अडकल्याने त्याला बाहेर पडण्याचीही संधी नव्हती. यावेळी रेल्वे स्थानकावर असणाऱया रेल्वे पोलीसांनी प्रसंगावधान राखत त्याला बाहेर ओढले. त्यामुळे त्या प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वास्को रेल्वे स्थानकातुन बुधवारी सायंकाळी बाहेर पडणाऱया रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला. यामध्ये त्याचा तोल जाऊन तो रेल्वे सोबत फरफटत गेला. प्लॅटर्फार्मवर असणारे रेल्वे पोलीस कृष्णा पाटील यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पळत जाऊन त्या प्रवाशाला बाहेर घेचले. यामुळे तो प्रवासी वाचू शकला. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हुबळी विभागिय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी कृष्णा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

खबरदारी गरजेची

धावत्या रेल्वेमध्ये चढण्याच्या अनेक अपघात होत आहेत. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी बेळगाव रेल्वेस्थानकारवही असा प्रकार घडला होता. तेव्हाही रेल्वे पोलिसांनी दाखसिलेल्या तप्तरतेमुळे बालिकेचा जीव वाचला. त्यामुळे धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करू नये, तसेच रेल्वे सुटण्यासाठी रेल्वेस्थानकावर दाखल होण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

मनपा कार्यालयावर पुन्हा कानडी नामफलक

Amit Kulkarni

खासबाग येथील गणेश मंदिरात चोरी

Omkar B

संकेश्वर नगरपरिषद पोटनिवडणुकीचा आज निकाल

Patil_p

पुन्हा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱयांची सक्त ताकीद

Patil_p

लोटस हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय शिबिर

Amit Kulkarni

अथणीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू

Patil_p
error: Content is protected !!