Tarun Bharat

प्रवीण ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यभेद करून इतिहास रचणार?

फिरोज मुलाणी / औंध : 

परिस्थिती आडवी आली…. संकटांनी अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला… मात्र तो नमला नाही. संकटामुळे संधी हुकली तर पुन्हा नशिबी कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याने अनेकदा जिद्द आणि आत्मविश्वासाने आलेल्या संकटाचा लक्ष्यभेद करीत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्याच कामगिरीच्या बळावर प्रवीण ऑलिम्पिकला चाललाय. अर्थात सरडे ते व्हाया अमरावती मार्गे टोकीओचा प्रवास अनेकांना स्वप्नवत वाटत असला तरी त्यामागे सरावातील सातत्य खेळाची आवड आणि फाटक्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या आई वडील, गुरुंचे पाठबळ मोलाचे ठरले आहे. तमाम जिल्हावासियांच्या नजरा प्रवीणच्या लक्ष्यभेदाकडे लागल्या आहेत.  

शालेय जीवनात अँथलेटिक्समध्ये करियर करण्यासाठी विकास भुजबळ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली प्रवीणची एक्सप्रेस सुसाट सुटली. वेगवान धावपट्टू होण्यासाठी ट्रकवर धावणाऱ्या प्रवीणने आपल्या अंगभूत कौशल्य आणि गुणवतेच्या जोरावर जिल्ह्याची सीमा ओलांडून अमरावतीची  क्रीडाप्रबोधनी गाठली. अनेक स्वप्ने उराशी बाळगून आलेल्या प्रवीणला धावण्यासाठी लागणारा खुराक त्याच्या शारीरिक क्षमतेसाठी कमी पडू लागला. धावण्याची गती कमी करावी तर घरात आई वडीला प्रमाणे रोजंदारी करण्याशिवाय पर्याय नाही. हीच बाब ओळखून प्रवीणने प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळातील ट्रॅक बदलला. तिरंदाजीसाठी त्याने धनुष्य खांद्यावर घेतले. खेळातील सातत्य कष्ट करण्याची तयारी जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्याने वर्षभराच्या सरावानंतर चक्क सुवर्ण पदकाचा लक्ष्यभेद घेतला. नवीन खेळात देखील यशाचा गिअर व्यवस्थित पडल्याने प्रवीणणे मागे वळून पाहिले नाही. घरातील परस्थीती अतिशय बेताची आहे आई वडील रोजंदारी करीत असल्याने आपल्याला जिद्दीने क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव त्याला झाली होती. 

अनेकदा कामगिरीच्या वाटेवर मोठी संकटे उभी राहिली मात्र लक्ष्य चुकले तर घरी जाऊन हातात टिकाव खोरे घेण्यापेक्षा जिद्दीने त्याने संकटाचा लक्ष्यभेद करून सर्वोत्तम कामगिरी बजावीत यशाचे टप्पे सर केले. वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णवेध, आशियाई स्पर्धेत पदकाला गवसणी घालून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने देशाचा तिरंगा फडकावला आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पदकावर अचूक निशाणा साधत ऑलिम्पिकमधील आपले स्थान पक्के केले. ऑलिम्पिकनंतर देखील जागतिक पोलीस दल आणि जागतिक तिरंदाजी स्पर्धेत देखील देशाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील तमाम क्रीडा शौकिनांच्या नजरा टोकीओमधील त्याच्या कामगिरी कडे लागल्या आहेत.

Related Stories

सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस

Patil_p

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील असुविधांविरोधात भाजपचे आंदोलन

datta jadhav

पालिकेच्या नव्या इमारतीच्या खोदकामादरम्यान आढळल्या रायफलीच्या गोळ्या

datta jadhav

सातारा : रणजित देशमुख यांचे औद्योगिक प्रकल्प राज्याला दिशा देणारे : माजी मंत्री राजेंद्र मुळक

Archana Banage

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना

Archana Banage

गोडोली तळय़ाच्या संवर्धनाचे काम लवकरच

Patil_p