Tarun Bharat

प्रवीण सुद यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी / बेळगाव

राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सुद यांनी शुक्रवारी बेळगाव उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची बैठक घेतली. पोलीस महासंचालकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच ते बेळगाव दौऱयावर आले आहेत. पोलीस मुख्यालयात मानवंदना देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास व पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी विमानतळावर प्रवीण सुद यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट पोलीस मुख्यालयात पोहोचले. मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांनी वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेतली.

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी, विजापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल, धारवाडच्या जिल्हा पोलीस प्रमुख वर्तिका कटीयार, गदगचे जिल्हा पोलीस प्रमुख एन. यतेश, बागलकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख लोकेश जगलासर, बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आदी वरिष्ठ अधिकाऱयांनी या बैठकीत भाग घेतला होता.

सायंकाळी मार्केटयार्ड येथील राज्य राखीव दलाच्या बटालियनला भेट देवून राज्य पोलीस महासंचालकांनी येथील कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी ते विमानाने बेंगळूरला रवाना झाले. राज्य पोलीस महासंचालकांचा पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिलाच बेळगाव दौरा होता.

Related Stories

स्पोर्ट्स ऑन, सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

जय किसान भाजीमार्केट रद्दसाठी पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे त्या घटनेचा निषेध

Amit Kulkarni

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद; एटीएम सुरू

Amit Kulkarni

समादेवी जन्मोत्सवाची महाप्रसादाने सांगता

Amit Kulkarni

मान्सूनसरींची आनंदवार्ता ! १० दिवस आधीच मान्सून धडकणार

Rahul Gadkar