Tarun Bharat

प्रशांत किशोरांकडून काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह; म्हणाले…!

ऑनलाईन टीम/तरुण भारत

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचं काँग्रेसवरील टीकास्त्र सुरूच आहे. मध्यंतरी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चांगल्याचं रंगल्या होत्या. किशोर यांनी देखील प्रियांका आणि राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यावरून ते लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार, असं वाटत होतं. पण हे न घडता अचानक प्रशांत किशोर यांनी काँग्रेसविरोधात वक्तव्ये करायला सुरुवात केली आहेत. आता पुन्हा एकदा किशोर यांनी ग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रशांत किशोर यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हयरल झाला असून या व्हिडीओमध्ये यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, भाजपाने ज्याप्रमाणे देशात राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देण्याचा ठेका घेतला आहे, त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचा ठेका काँग्रेसकडे आहे.

किशोर म्हणाले,” काँग्रेस निवडणूक लढो अथवा न लढो, जिंको अथवा हारो पण भाजपविरोधी जागा त्यांच्या मालकीची आहे. आणि जे भाजपशी लढत आहेत, भाजपला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचं काँग्रेससोबत पटत नाही, म्हणून ते भाजपचे एजंट झाले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे देशात राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देण्याचा ठेका भाजपने घेतला आहे, त्याचप्रमाणे देशात मोदीविरोधी आणि धर्मनिरपेक्षतेचं प्रमाणपत्र देण्याचा नवा ठेका काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने निवडणूक लढवून भाजपचा पराभव केला पाहिजे. तुम्ही निवडणूक लढवा. तुम्ही ६०-७० टक्के जागांवर भाजपशी लढत आहात, त्यांना पराभूत करा, तुम्ही बाकी लोकांच्या फंदात का पडत आहात,” असं किशोर म्हणाले.

Related Stories

खालच्या पातळीचं राजकारण ठाकरे-पवारच करु शकतात – किरीट सोमय्या

Archana Banage

देशाने नोंदवलाय अनपेक्षित रेकॉर्ड

datta jadhav

आंब्याचं लोणचं पडलं महागात, 100 ग्रामस्थ विलगीकरणात

Patil_p

कर्नाटकातील फास्टर बोटी राज्याच्या हद्दीत

Archana Banage

शाहीनबागमध्ये 9 पासून ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

पंजाब : गेल्या 24 तासात 726 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Tousif Mujawar