Tarun Bharat

प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँगेस पक्षातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता निवडणूक विषयक सल्लागार प्रशांत किशोर यांनी स्वतःच नवा पक्ष स्थापन करणार असल्याचा संकेत दिला आहे. या पक्षाचा श्रीगणेशा स्वतःचे मातृराज्य बिहारमधून करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. पक्ष स्थापना करुन प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा त्यांनी एक वर्षापूर्वी व्यक्त केली होती.

दोन आठवडय़ांपूर्वी त्यांच्या काँगेस पक्ष प्रवेशाच्या शक्यतेची चर्चा जोरात होती. तथापि, त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश करणार नसल्याचे नंतर घोषित केले होते. त्यांनी काँगेसला अनेक सूचना केल्या होत्या. तथापि, त्यातील महत्वाच्या सूचना मान्य न झाल्याने त्यांनी काँगेसमध्ये जाण्याचा विचार सोडला असे बोलले जाते. आता ते स्वतःच राजकीय पक्षाची स्थापना करुन लवकरच राजकारण प्रवेश करीत आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांनी जनसुराज नावाची आघाडी स्थापन केली होती. त्यांच्या संभाव्य राजकीय पक्षाचे नाव जनसुराज असेच असण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष स्थापन केला तरी त्वरित निवडणुका लढविण्याची शक्यता प्रशांत किशोर यांनी फेटाळली आहे. प्रथम पक्षाची पायाभरणी करुन नंतर पूर्ण तयारीनिशी निवडणुकांच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले. ते अनेक राज्यांमध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व निर्माण करणार आहेत. सध्याच्या राजकीय पक्षांसंदर्भात भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी स्वतःच राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार केला, असे बोलले जाते.

Related Stories

अर्थमंत्र्यांनी बोलावली ‘एफएसडीसी’ची बैठक

Patil_p

देशात कोरोना संसर्गाची त्सुनामी

Amit Kulkarni

मोरेटोरियम प्रकरणी आता 13 ऑक्टोबरला सुनावणी

Patil_p

नोएडा : चार वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

तामिळनाडूत फटका फॅक्टरीत भीषण स्फोट; 11 ठार; 36 जखमी

datta jadhav