Tarun Bharat

प्रशासकीय अधिकाऱयांनी जनतेच्या सेवेला प्राधान्य द्यावे

कोरडवाहू जमीन कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांचे प्रतिपादन अथणी शुगर कारखान्यात कार्यक्रम

प्रतिनिधी / कागवाड

आई-वडिलांच्या पुण्याईने, गरीब जनतेच्या आशीर्वादाने आय.ए.एस. व आय.पी.एस. सारख्या मोठय़ा हुद्दय़ावर काम करण्याची संधी सुदैवाने मिळते. तरी निर्णय घेताना, जनतेची सेवा करताना मनात कमीपणा बाळगू नका. प्रत्येक दिवशी काम करताना तुमच्या भेटीसाठी ताटकळत असलेल्यांना भेटून समस्या जाणून घ्या, असा संदेश देशात प्रशासकीय सेवेत असणाऱया अधिकाऱयांना देशाचे नाबार्डचे माजी अध्यक्ष व कोरडवाहू जमीन कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी दिला आहे.

शनिवारी सायंकाळी कागवाड तालुक्मयातील केम्पवाड येथील अथणी शुगर वर्क्स साखर कारखान्याच्या सभेमध्ये आयोजित केलेल्या समारंभात डॉ. यशवंतराव थोरात बोलत होते.

 कागवाड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे वस्त्राsद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांचे निकटवर्तीय डॉ. यशवंतराव थोरात यांची विशेष भेट व मतदारसंघातील कोरडवाहू जमिनीचा पाहणी कार्यक्रम पार पडला.

डॉ. यशवंतराव थोरात बोलताना म्हणाले, मी एक गरीब शेतकरी कुटुंबातील जन्मलेली व्यक्ती असून माझ्या वडिलांनी माझ्यावर उत्कृष्ट संस्कार केले आहेत. आपण नाबार्डचा अध्यक्ष असताना काम करताना कुणालाही दुखावलेलं नाही. एकंदरीत गरीब व कष्टकरी लोकांच्या हितासाठी मी योजना राबवल्या आहेत, असे सांगितले. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राजकीय मंडळींनी तसेच अधिकाऱयांनी कोरडवाहू शेती पाण्याखाली आणून त्यातून उत्पादन मिळवून देशाची प्रगती साधणे शक्मय आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. कागवाड विधानसभा मतदारसंघातील कोरडवाहू जमीन पाण्याखाली आणण्यासाठी पाणीपुरवठा योजना राबविली आहे. मात्र ती अद्याप कार्यान्वित नाही. याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 कागवाड मतदारसंघांमध्ये लवकरच नवनवे प्रकल्प

वस्त्राsद्योग मंत्री श्रीमंत पाटील बोलताना म्हणाले, देशातील मोठय़ा हुद्दय़ावर सेवा केलेले, देशाची आर्थिक व्यवस्था पाहणारे महनीय व्यक्ती डॉ. यशवंतराव थोरात यांनी मतदारसंघाला भेट देऊन येथील कोरडवाहू जमीन व शेतीतील प्रगतीविषयी आपले विचार व्यक्त करून कागवाड मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळय़ा योजना राबवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कागवाड मतदारसंघांमध्ये लवकरच नवनवे प्रकल्प उभा करणार असल्याचे श्रीमंत पाटील यांनी सांगितले. या समारंभामध्ये साखर कारखान्याचे संचालक डॉ. वसंतराव जुगळे, साखर कारखान्याचे व्यवस्थापक रामचंद्र लटके, रामचंद्र गुबाडे, बाबासाहेब भोसले यांनी आपले विचार मांडले. यावेळी साखर कारखान्याचे एम. डी. श्रीनिवास पाटील, योगेश पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपचे प्रमुख दादा पाटील, शीतल पाटील, शिवानंद पाटील, अभयकुमार अकिवाटे, रवींद्र पुजारी, विनायक बागडी, तम्मण्णा पारशेट्टी, राजेंद्र पोतदार, भरतेश पाटील, महादेव कोरेंसह अनेक मान्यवर मंडळींची मोठी उपस्थिती होती.

Related Stories

कारागृहात साक्षरता कार्यक्रम

Amit Kulkarni

प्रदूषण मुक्त होळी; अनारोग्यास जाळी

Amit Kulkarni

धावत्या कारने घेतला पेट

Tousif Mujawar

भारतनगर-शहापूर येथील युवकाचा खून

Patil_p

बारुदवाले-मांगलेकर वॉरियर्स संघाला जेतेपद

Amit Kulkarni

निपाणी आगार निर्बंध शिथिलच्या प्रतीक्षेत

Omkar B
error: Content is protected !!