Tarun Bharat

प्रशिक्षक क्लुसनरच्या वेतनामध्ये कपात

Advertisements

वृत्तसंस्था/ काबुल

अफगाण क्रिकेट मंडळाने प्रमुख प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लुसनर यांच्या वेतनामध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारी संकटामुळे अफगाण क्रिकेट संघटनेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या जूनमध्ये झिंबाब्वेच्या दौऱयावर अफगाण संघ जाणार आहे पण हा दौरा रद्द झाला तर अफगाण क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांच्या वेतनामध्ये 50 टक्के कपात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अफगाण संघाला प्रशिक्षण देणाऱया प्रशिक्षकांच्या वेतनामध्ये मे महिन्यापासून 25 टक्के कपात केली जाईल. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले नाही तर मात्र 50 टक्के कपात करण्यात येईल, असे अफगाण क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. अफगाण क्रिकेट मंडळाने आतापर्यंत 32 वरिष्ठ आणि 55 राष्ट्रीय स्पर्धेतील क्रिकेटपटूंशी मध्यवर्ती करार केला आहे.

Related Stories

इंग्लंड कसोटी संघात बेसचा समावेश

Patil_p

क्रीडा पत्रकार किशोर भिमानी कालवश

Patil_p

कोरोना बाधित हॉकीपटूंच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

आयपीएल 2020 : हैदराबादला धक्का देत दिल्लीची अंतिम फेरित धडक

Archana Banage

राष्ट्रकुलसाठी महिला हॉकी संघ जाहीर

Amit Kulkarni

रोहित, कोहली, अश्विनचे मानांकन जैसे थे

Patil_p
error: Content is protected !!