Tarun Bharat

प्रशिक्षित ‘डॉग कॅचर’ची कमतरता

नंदकुमार तेली / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या कुत्रा बंदोबस्त विभागातील प्रशिक्षित दोन नेपाळी डॉग कॅचर सुट्टीवर गेले आहेत. सध्या कंत्राटी पध्दतीने दोन डॉग कॅचरवर कुत्रा बंदोबस्ताची जबाबदारी आहे. तसेच निर्बिजीकरण प्रक्रिया थंडावली असून कुत्रा संख्या वाढीवर नियंत्रण राखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे शहरासह उपगरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी असणाऱ्या प्रशिक्षित `डॉग कॅचर’ची कमतरता निर्माण झाली आहे.

प्रशिक्षित ‘डॉग कॅचर’ची भरती आवश्यक
मनपाच्या कुत्रा बंदोबस्त विभागात दररोज भटक्या बंदोबस्त व निर्बिजीकरणा संदर्भात अनेक तक्रारी येतात. सध्या मोबाईलवरुन संदेशाव्दारे (एसएमएस) तक्रारींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, या पथकामध्ये प्रशिक्षित डॉग कॅचरची कमतरता असल्यामुळे कुत्रा बंदोबस्ताला मर्यादा आल्या आहेत. तसेच आयसोलेशन हॉस्पिटल येथे कुत्र्यांचा निर्बिजीकरण विभाग असून निर्बिजीकरणाची प्रक्रियाही थंडावली आहे. यामुळे शहरासह उपनगरातील परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.

कंत्राटी डॉग कॅचर अन् कारवाई अत्यल्प
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांच्या दररोज अनेक ऑनलाईन तक्रारी येतात. या तक्रारींच्या तुलनेत कारवाई अत्यल्प असल्याने शहरासह उपनगरातील परिसरामध्ये कुत्र्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. सध्या कुत्रा बंदोबस्ताची धुरा अवघ्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असून पूर्वीपेक्षा कुत्रा बंदोबस्त प्रमाणात घट झाली आहे. त्यांची नियुक्ती कोणत्या बेसवर करण्यात आली आहे. याविषयी कुत्रा बंदोबस्त विभागाच्या वर्तुळात चर्चा आहे. यापूर्वी कुत्रा बंदोबस्त पथकात अमर हेगडे, अमर कांबळे, विकास कांबळे आदी कायम कर्मचाऱयांचा समावेश होता. यातील दोन नेपाळी प्रशिक्षित डॉग कॅचर सुट्टीवर गेल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बंदोबस्ताचे प्रमाण घटले
तक्रार नोंदविल्यानंतर डॉग कॅचर व्हॅन कारवाईसाठी बाहेर पडते. कुत्रा बंदोबस्त पथकातील डॉग कॅचर कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण विभाग अथवा शहरापासून लांब माळावर सोडून देतात. यापूर्वी प्रशिक्षित डॉग कॅचरकडून 10 ते 15 कुत्र्यांचा दररोज बंदोबस्त केला जात होता. मात्र, सध्या यामध्ये घट झाली असून 4 ते 5 कुत्रा बंदोबस्तवर आले आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नियुक्त केल्याने काम चांगले असतानाही कायम कर्मचाऱ्यांना साफ-सफाईचे काम देण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

तक्रार ऑनलाईन तर कारवाई ‘ऑफ’लाईन
कोरोना काळात वेतन न मिळाल्याने तत्काळ कारवाई करणारे नेपाळी डॉग कॅचर नोकरी सोडून आपल्या गावी गेले आहेत. तसेच सध्या कुत्रा बंदोबस्त पथकासह निर्बिजिकरण विभागातील प्रक्रियाही थंडावली आहे. या विभागातील तक्रारी ऑनलाईन तर कारवाई मात्र, `ऑफ’ लाईन असल्याची परिस्थिती आहे. कारवाई शून्य कारभारामुळे उपनगर व शहर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण : विनोद नाईक (कुत्रा बंदोबस्त विभागप्रमुख)
गेल्या महिन्यापासून दोन नेपाळी डॉग कॅचर सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर जखमी, भटकी कुत्री, इतर जनावरे बंदोबस्त आदी कामाचा ताण असून आणखी 6 प्रशिक्षित डॉग कॅचर भरतीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. निर्बिजीकरणचे प्रमाण दररोज 10 ते 15 कुत्र्यांवरून 4 ते 5 वर आले आहे. आणखी सहा रिक्त जागा भरल्यास कामाचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

डॉक्टर व प्रशिक्षित डॉग कॅचरची भरती : अध्यक्षा कल्पना भाटिया (जीवरक्षा ऍनिमल केअर ट्रस्ट)
आयसोलेश हॉस्पिटलमध्यील कुत्रा निर्बिजीकरण विभागातील डॉक्टर सुट्टीवर असल्याने गेल्या आठवडयापासून कुत्र्यांच्या निर्बिजीकरण सर्जरी विभागातील प्रक्रिया थंडावली आहे. 15 ते 20 निर्बिजीकरण सर्जरीचे प्रमाण सध्या 4 ते 5 वर आले आहे. येत्या महिनाभरात उत्तरप्रदेशातून नविन दोन तज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित डॉग कॅचरची भरती करण्यात येणार आहे. यामुळे सध्याची निर्बिजीकरणाची थंडावलेली प्रक्रिया व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

Related Stories

एसटी बसमधून महिला प्रवाश्याची 1 लाख 62 हजार 500 रूपयांच्या रोकडीची बॅग लंपास

Abhijeet Khandekar

प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान गेले कुठे ?

Archana Banage

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड बिनविरोध

Archana Banage

६५ वर्षांनंतरही नर्सिंगच्या जागा तितक्याच

Abhijeet Khandekar

अंध 15 विद्यार्थ्यांना दीड लाखांची शिष्यवृत्ती प्रदान

Archana Banage

Live update; शिवाजी विद्यापीठावर विद्यापीठ आघाडीचे वर्चस्व

Archana Banage