Tarun Bharat

प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला बायडेन यांनी दिली ऑन माईक शिवी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महागाईवर प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला ऑन माईक शिवी दिली. शिवी देत असताना माईक चालू असल्याचे बायडेन यांच्या कदाचित लक्षात आले नाही. दरम्यान, या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

बायडेन यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डूसी यांनी बायडेन यांना अमेरिकेतील महागाईबाबत प्रश्न विचारला. महागाई ही राजकीय जबाबदारी आहे का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर बायडेन थोडावेळ काहीच बोलले नाही. त्यानंतर ‘ही एक खूप मोठी संपत्ती आहे. जास्त महागाई,’ असे टोमणेदार उत्तर त्यांनी दिले. तसेच पत्रकाराकडे पाहून काय वेडा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी son of a b**ch अशी शिवी दिली.

Related Stories

एकही मृत्यू नाही

Patil_p

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; 4 ठार

datta jadhav

ज्या वृत्ती विरुद्ध शाहू महाराज लढले, ती संपवली पाहीजे : मुख्यमंत्री ठाकरे

Abhijeet Khandekar

ना डरेंगे; ना झुकेंगे! चौकशी सुरू असतानाच मलिकांच्या ट्विटर हँडलवरुन सूचक इशारा

datta jadhav

दिल्ली लॉकडाऊनमध्ये वाढ, 31मेपर्यंत निर्बंध कायम

Archana Banage

मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील-संभाजीराजे

Archana Banage