Tarun Bharat

प्रसंगी ब्रॉड किंवा अँडरसनलाही वगळले जाईल

इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांचे प्रतिपादन

लंडन / वृत्तसंस्था

इंग्लंडचा संघ वेळप्रसंगी कठीण निर्णय घ्यावे लागणार असतील तरी त्यासाठीही डगमगणार नाही, असे प्रतिपादन इंग्लिश क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत स्टुअर्ट ब्रॉड किंवा जेम्स अँडरसन यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांपैकी एकाला वगळण्याची वेळ आली तर त्यासाठी आपली तयारी असेल का, या प्रश्नावर ते बोलत होते. उभय संघातील दुसरी कसोटी नव्या वर्षात दि. 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला 107 धावांनी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला असून या पार्श्वभूमीवर इंग्लिश संघात फेरबदल करण्याबाबत चर्चा सुरु आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सॅम करण प्रभावी ठरला तर दुसऱया डावात जोफ्रा आर्चरने 5 बळी घेतले. यामुळे दुसऱया कसोटीत अतिरिक्त फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यास इंग्लिश संघव्यवस्थापनाला ब्रॉड किंवा अँडरसन यांच्यापैकी एकाला वगळावे लागेल.

‘जिम्मी अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्यामुळे आमची गोलंदाजी अधिक भक्कम आहे. त्यामुळे, त्यांना वगळण्याचा निर्णय आमच्यावरच उलटणाराही ठरु शकतो. पण, युवा खेळाडूंना स्थान देण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात आणि एखादा फिरकीपटू खेळवायचा असेल तर आम्हाला या निर्णयाप्रत यावेच लागेल’, असे सिल्वरवूड येथे म्हणाले.

जोस बटलर व जॉनी बेअरस्टो यांच्यापैकी एकानेही 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही, यामुळे इंग्लंडसाठी ही देखील चिंतेची बाब ठरत आली आहे. ‘बटलर व बेअरस्टो हे दोघेही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. बेअरस्टो न्यूझीलंड दौऱयासाठी निवडलेल्या संघात नव्हता. पण, त्याने पडद्यामागे बरीच मेहनत घेतली. तो पोचेफस्ट्रूम व नंतर केपटाऊन येथे जलद गोलंदाजांबरोबर राहिला. संघात येण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे’, असे सिल्वरवूड म्हणतात.

Related Stories

ब्रिग्टनकडून लिव्हरपूलला पराभवाचा धक्का

Patil_p

मिताली, मानधना यांचे मानांकनातील स्थान स्थिर

Patil_p

प्रो कबड्डी लीग स्पर्धा – प्ले-ऑफ गटातील स्थान निश्चितीसाठी आगेकूच

Patil_p

सिंधू, प्रणित, सिक्की यांच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

कसोटी गोलंदाजांत अश्विन-अँडरसन संयुक्त अग्रस्थानी

Patil_p

मुंबईच्या प्रशिक्षकपदी अमोल मुजूमदारची निवड

Amit Kulkarni