Tarun Bharat

प्रसिद्धीसाठी आरोप नकोत धमक असल्यास आरोप सिद्ध करून दाखला

Advertisements

पर्यटनमंत्री आजगांवकर यांचे विरोधकांना आव्हान

प्रतिनिधी / मडगाव

प्रसिद्धी मिळविण्यासाठी आरोप करणे सहज शक्य असते. पण, आरोप सिद्ध करण्याची धमक असली पाहिजे असे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर यांनी आपल्या राजकीय विरोधकांना आव्हान दिले आहे. हल्लीच विधानसभेत पर्यटन खात्यावरील प्रश्नावरून विरोधकांनी पर्यटनमंत्री श्री. आजगांवकर यांना लक्ष केले होते. त्या संदर्भात श्री. आजगांवकर दै. तरूण भारतपाशी बोलत होते.

विरोध म्हणतात की, एका एजन्सीला आम्ही पैसे दिले. पण, जर कार्यक्रम झालाच नसेल तर पैसे देण्याचा प्रश्न येतो कुठून. कोरोना महामारीमुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. कार्यक्रम करण्यासाठी एजन्सीला 20-25 दिवस अगोदर आदेश द्यावा लागतो. हा आदेश मिळाल्यानंतर एजन्सी आवश्यक असलेले सर्व सोपस्कार पूर्ण करीत असते. त्यात स्टॉल्स लावण्यापासून आवश्यक मनुष्य बळाची तयारी करावी लागते आणि एजन्सी हे करीत असतानाच कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कार्यक्रमच रद्द झाला. त्यामुळे एजन्सीने जेव्हढे काम केले होते. त्याचे पैसे त्यांना चुकते करावेच लागले.

कोरोना महामारीमुळे एकूण तीन कार्यक्रम होऊ शकले नाही. एका कार्यक्रमाची तयारी सुरू होत असतानाच तो कार्यक्रम बंद करावा लागला. पण, त्यासाठी एजन्सीने जी तयारी केली होती. तिचे पैसे चुकते करणे बंधनकारक होते. पर्यटनाला चालना देण्यासाठी विदेशात रोड शो किंवा अन्य कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यावेळी स्पैस (जागा) बुकिंग करावी लागते. हे बुकिंग आतंरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते. आणि असे बुकिंग केले की, पर्यटन खाते त्यांना पैसे देत असे. बऱयाचवेळा असे घडले की, स्पैस बुकिंगसाठीचे पैसे संबंधितांना उशिरा मिळू लागले. हय़ा पैशांसाठी ते तडजोड करीत नाही आणि पैसे मिळाले नाही तर ते स्पैस बुकिंग करीत नाही. त्यामुळे रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. अशावेळी पर्यटन खात्याने निर्णय घेतला की, स्पैस बुकिंगसाठी एजन्सीनेच पैसे भरावे व नंतर एजन्सीला पर्यटन खात्याने ते चुकते करावे. अशा पद्धतीने एजन्सीने स्पैस बुकिंगसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पैसे जमा केले. त्या एजन्सीला पर्यटन खात्याने पैसे चुकते केले. त्यानतंर कार्यक्रमच रद्द झाला. त्यामुळे ते पैसे एजन्सीकडेच राहिले. यात ‘भ्रष्टाचार’ कसला व ‘टक्केवारी’ कसली असा सवाल पर्यटनमंत्री श्री. आजगांवकर यांनी उपस्थितीत केला आहे.

आपल्या हाती पर्यटन खाते आल्यानंतर गोव्यात येणाऱया पर्यटकांची संख्या वाढत गेली आहे. आपल्याकडे पर्यटन खाते येण्यापूर्वी व आल्यानंतरची आकडेवारी पाहिल्यास त्यात प्रचंड फरक असल्याचे आढळून येत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात येण्याची संख्या तीन ते चार पटीने वाढली आहे. गोव्यात पर्यटक यावे यासाठी पर्यटन खात्याने जे मार्केटिंग व प्रोमोशन केले होते ते नंबर वन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मार्केटिंग व प्रोमोशन साठी ज्या व्यक्ती काम करतात, त्या व्यक्ती तज्ञ आहेत. त्यांनी ‘वर्ल्ड टूर’ देखील केला आहे. त्यात बाबू केणी, नंदन इत्यादीचा यांचा समावेश आहे. हे तज्ञ शिफारस करतात, त्या प्रमाणे पर्यटन खाते रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात सहभागी होण्यासंदर्भात निर्णय घेत असते. एखाद्या रोड शो किंवा कार्यक्रमात सहभागी झाल्यास, गोव्याला पर्यटनदृष्टय़ा फायदा होईल असा सल्ला तज्ञांनी दिल्यानंतरच पर्यटन खाते अंदाजे किंमत ठरविते व सरकारच्या मान्यतेसाठी सरकारला पाठवून दिली जाते. सरकारच्या वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतरच ई-निविदा जारी केल्या जातात असे श्री. आजगांवकर म्हणाले.

पर्यटन खात्याने राष्ट्रीय तसेच आंतररष्ट्रीय पातळीवर जो प्रचार केलेला आहे. त्यात गोवा हे एक क्रमाकांचे पर्यटन स्थळ असल्याचा आवाज पूर्ण जगभरात पसरला आहे आणि यासाठी पर्यटन खात्याला पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याच बरोबर मोठय़ा संख्येने पर्यटक देखील गोव्यात आलेले आहेत. त्यात सरकारकडे अधिकृत उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे 88 लाखांची नोंद झालेले आहे. यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश होत आहे. जेव्हा कोरोना महामारीचा काळ सुरू झाला तेव्हा पर्यटन खात्याने एक सर्वेक्षण केले. त्यात कोरोना महामारीच्या पूर्वी किती पर्यटकांनी गोव्याला भेट दिली याचे सर्वक्षण  ‘केपीएमजी’ यांनी केले. त्यात त्यांनी जो अहवाल दिला. त्यात गोव्यात 1 कोटी 50 लाख पर्यटकांनी भेट दिल्याचे आढळून आले.

सरकारडे अधिकृत नोंद ही 88 लाख पर्यटकांची आहे. उर्वरित पर्यटक आले, त्यांची नोंद सरकार दरबारी नाही. पर्यटन व्यवसाशी संबंधित असलेल्या काही जणांनी अद्याप पर्यटन खात्याकडे अधिकृत नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पर्यटक आले तरी त्यांची अधिकृत नोंदणी होत नाही. काही पर्यटक रेल्वेतून आले, काही खाजगी वाहने घेऊन आलेत, काही जण येतात व खाजगी घरांनी रहातात, काही जण पर्यटन खात्याकडे नोंद न झालेल्या हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतरच गोव्यात 1 कोटी 50 लाख पर्यटक गोव्यात आल्याचे स्पष्ट झाले. पर्यटक मोठय़ा संख्येने आले तरी पर्यटन खात्याला त्याचा विशेष लाभ झालेला नाही. मात्र, पर्यटन व्यवसायात असलेल्या लोकांना नक्कीच याचा फायदा झाल्याचे मंत्री श्री. आजगांवकर म्हणाले. आत्ता पर्यटक खात्याने एक कायदा केला आहे. ज्यात पर्यटक आले व त्यांनी पर्यटन खात्याशी नोंद नसलेल्या ठिकाणी व्यवहार केला तर अशा पर्यटकांची जबाबदारी पर्यटन खात्यावर असणार नाही. त्यामुळे आत्ता अनेकांनी स्वताहून पर्यटन खात्याकडे आपली नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आम्हाला ड्रग्स घेणारे तसेच उघडय़ावर दारू पिणारे, स्वयंपाक करणारे पर्यटक आम्हाला नको आहेत. गोंय, गोंयकार, गोंयकारपण चालविणारे पर्यटकच आम्हाला हवे आहेत असे श्री. आजगांवकर म्हणाले. 

Related Stories

नावेलीतील ‘सायपे’ तळय़ाचे भाग्य उजळणार…

Amit Kulkarni

बांदोडकर सुवर्ण चषकावरील सोनं गायब झाल्याचा जीएफएचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांचा आरोप

Omkar B

सांगे मतदारसंघात तृणमूलचा कोपरा बैठकांचा सपाटा

Sumit Tambekar

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम

Amit Kulkarni

अग्निशामक दलाचे कार्य उल्लेखनीय

Omkar B

मोपा विमानतळासाठी केंद्राचा सुधारीत पर्यावरण दाखला

tarunbharat
error: Content is protected !!