Tarun Bharat

प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी मुंबईला रवाना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये होणाऱया आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाचा विस्तार केल्यानंतर या संघात स्थान मिळविणारा कर्नाटकाचा वेगवान गोलंदाज एम प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी बेंगळूरहून मुंबईत दाखल होणार आहे.

प्रसिद्ध कृष्णाला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून तो आता पूर्ण बरा झाला असून सध्या तो आपल्या घरीच क्वारंटाईनमध्ये आहे. त्याची प्रकृती पूर्ववत झाली असून तो भारतीय संघात दाखल होण्यासाठी 23 मे रोजी मुंबईला रवाना होत आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने कोलकाता नाईटरायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. इंग्लंड दौऱयासाठी बीसीसीआयने चार राखीव खेळाडूंची निवड केली आहे. प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, नगवासवाला आणि अभिमून्य ईश्वरन हे या आगामी दौऱयासाठी राखीव खेळाडू राहतील. भारताचे पुरूष आणि महिला क्रिकेट संघ 2 जून रोजी चार्टर फ्लाईटने मुंबईहून लंडनला प्रयाण करतील.

Related Stories

मेकॉलम इंग्लंड कसोटी संघाचा प्रमुख प्रशिक्षक

Patil_p

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी आज संघनिवड

Patil_p

पृथ्वी शॉचा न्यूझीलंड दौरा अनिश्चित

Patil_p

आयपीएलनंतर ‘या’ खेळाडूंना विश्रांती

Archana Banage

स्वित्झर्लंडला महिला नेमबाजीत प्रथमच सुवर्ण

Patil_p

निवृत्त झालेलो नाही, मायदेशातच कारकिर्दीचा समारोप करेन!

Patil_p