Tarun Bharat

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन

महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमाावला

मुंबई /प्रतिनिधी

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते .खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या गाण्यांनीच छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.

छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. मुळात ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जारण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. त्यामुळे महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमाावला आहे.

Related Stories

बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पालिकाही रस्त्यावर

Archana Banage

NIA कडून दाऊद इब्राहिमसह ४ साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Archana Banage

सोलापूर : मर्चंट नेव्हीमधील अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला;आरोपी मोकाट

Archana Banage

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,027 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

रत्नागिरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पतीस अटक

Archana Banage

महाराष्ट्रात पुन्हा नवीन निर्बंध लागू ; सोमवारपासून सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच!

Archana Banage