Tarun Bharat

प्रसिद्ध वकील राजीव गोम्स निवर्तले

प्रतिनिधी / मडगाव

गोव्यातील एक प्रसिद्ध वकील राजीव गोम्स यांचे बुधवारी रात्री मडगावातील एका खासगी इस्पितळात निधन झाले. ते 50 वर्षांचे
&चे होते. दक्षिण गोवा वकील संघटनेचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

एक प्रख्यात क्रिमीनल ऍडव्होकेट म्हणून त्यांचा गोव्यात विशेषतः दक्षिण गोव्यात त्यांचा गवागवा होता.

परराज्यातून गोव्यात आयात करण्यात येत असलेल्या मासळीत फॉर्मालीन असल्याचा आरोप करुन 17 ट्रक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी भुमीका घेऊन सर्वसामान्यांच्यावतीने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.   अनेक खटल्यात खास सरकारी वकील म्हणून काम केलेले आहे.

काणकोण येथे रुबी रेझिडन्सी ही इमारत कोसळून अंदाजे 32 कामगार ठार झाले होते. या खटल्यात तत्कालीन गोवा सरकारने ऍड. राजीव गोम्स यांना खास सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, पुन्हा पुन्हा प्रसिद्धी माध्यमाकडे धाव घेत असल्याच्या कारणास्तव तत्कालीन सरकारने त्याचे हे खास वकीलपत्र मागे घेतले होते.

वास्को येथील प्रख्यात डॉक्टर श्रीकांत वेरेकर यांच्यासह राज्यातील अनेक  व्यक्तांच्या खून प्रकरणासंबंधी ऍड. राजीव गोम्स यांनी आरोपींचे वकीलपत्र स्विकारले होते आणि आरोपींच्यावतीने ते न्यायालयात सरकारपक्षाच्याविरुद्ध लढत होते.

दक्षिण गोवा वकील संघटनेचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या अकाली निधनाने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ऍड. राजीव गोम्स यांचा फोटो ई मेलवर पाठवला आहे.

Related Stories

पालिकेच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांची बदनामी का ?

Patil_p

मगो स्वबळावर 24 जागा लढणार

Amit Kulkarni

मडगाव, फातोर्डातील खराब रस्ते दुरुस्त करा : शिवसेना

Amit Kulkarni

गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन सुरुच. आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Omkar B

गोव्यात उष्णतेचा कहर पारा 36 डिग्री.से. वर

Amit Kulkarni

विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यपालांना निवेदन

Patil_p
error: Content is protected !!