Tarun Bharat

प्रसिद्ध वास्को सप्ताहनिमित्त विन्सन वर्ल्डतर्फे यूटय़ूबवर लाईव्ह (थेट) कार्यक्रम

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

अनेक वर्षाची पंरपरा असलेला वास्को येथील दामोदर भजनी सप्ताह यावर्षीहि कोरोना महामारीमुळे मर्यादित स्वरूपात साजरा केला जाईल. असं असलं तरी, या वर्षीहि  या सप्ताहानिमित्त वास्को येथील प्रसिद्ध उद्योगपति श्रीपाद शेटय़े, संजय शेटय़े व त्यांच्या विन्सन वर्ल्डतर्फे भक्तीगीतांचा एक अनोखा कार्यक्रम त्यांच्या विन्सन अकादमीच्या यूटय़ूब चॅनलवर शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून रसिकांसाठी व भक्तगणांसाठी लाईव्ह (थेट) दाखवला जाणार आहे. या भक्तीगीतांच्या थेट कार्यक्रमाचा आस्वाद गोव्यातील तसेच जगभरातील रसिक घेऊ शकतील. गेल्या वर्षापासून शेटय़े बंधूतर्फे हा कार्यक्रम ऑनलाईन सादर केला जात आहे. यंदाहि गोमंतकीय कलाकाराबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत कलाकार भक्तीगीते सादर करणार आहेत. या लाईव्ह कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी, मंजुषा कुलकर्णी, प्रियांका बर्वे, डॉ. प्रवीण गावकर, देवानंद मालवणकर, समीक्षा भोबे व पल्लवी पाटील हे भक्तीगीते सादर करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचं निरूपण पुणे येथील प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये करणार आहेत. या भक्तीमय कार्यक्रमाला प्रशांत पांडव, उदय कुलकर्णी, दयेष कोसंबे, सुभाष फातर्पेकर, अनय गाडगीळ, आदित्य आपटे, धनंजय वासवे, दत्तराज शेटय़े, बाळकृष्ण मेस्त, किशोर तेली व गोपाळ प्रभू साथसंगत करणार आहेत. अलीकडे कोरोनामुळे संगीताचे कार्यक्रम विविध समाज माध्यमावर सादर होत आहेत व ते लोकप्रियहि होत आहेत. असाच हा कार्यक्रम वास्को येथील दामोदर सप्ताहाच्यानिमित्ताने रसिकांसाठी उपलब्ध होणार असून, त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असे आवाहन शेटय़े बंधूतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू विन्सन वर्ल्डतर्फे सांभाळण्यात येणार आहे.

Related Stories

भाजप सरकारचे अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

आडपई गावातील परिस्थितीचा आयुषमंत्र्यांनी घेतला आढावा

Omkar B

गोवा माईल्स रद्द करा अन्यथा पर्यटन मंत्री आणि पर्यटन महामंडळाच्या चेअरमनना घरी पाठवू : टेक्सी व्यवसाईकांचा इशारा

Amit Kulkarni

आतापर्यंत कोरोनामुळे 9 मुलांचा मृत्यू

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशनासंदर्भात ‘आप’च्या बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

नुवे, श्रीस्थळच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीत सापडला

Amit Kulkarni
error: Content is protected !!