Tarun Bharat

प्रसूतीसाठी लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे ताब्यात

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

प्रसूतीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे याला ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराच्या पत्नीला प्रसूतीकरीता ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडागळे याने प्रसूतीसाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर शुक्रवारी सकाळी ९ हजार रुपये देण्याचे ठरले.

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून प्रसूतीकरीता डॉ. अडागळे याला ९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्निल संकी यांनी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Related Stories

भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये

prashant_c

शिरोळमध्ये जुगार अड्यावर छापा सात जण ताब्यात

Abhijeet Shinde

तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 267 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

तहव्वूर राणाला अमेरिकेत पुन्हा अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

datta jadhav

सोलापूर : माढा सबजेलमधून पळालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; दोघे अद्याप फरार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!