Tarun Bharat

प्रस्थापितांना अच्छे दिन, नवख्यांच्या वाटेला संघर्ष

Advertisements

कोल्हापूर / विनोद सावंत

महापालिकेची प्रथमच त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाली आहे. यामुळे प्रभागातील क्षेत्रात वाढ झालीच आहे शिवाय एक प्रभाग तब्बल 19 हजार 900 लोकसंख्याचा झाला आहे. याचा फायदा अनेक वर्ष महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असणाऱ्या प्रस्थापितांना होणार आहे. तर नवख्यांच्या वाटेला संघर्ष असणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून प्रथमच त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली आहे. मनपा प्रशासनाने ही प्रभाग रचना मंगळवारी जाहीर केली. 31 वॉर्ड आणि 92 सदस्य असे स्वरूप आहे. यापूर्वी 5 ते 7 हजारांचा असणारा एक प्रभाग 12 हजारपासून ते 19 हजार लोकसंख्या असणारा आहे. प्रत्येक प्रभागाचे क्षेत्रही वाढल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होणार आहे. काही प्रभाग जुन्या प्रभागातील दोन पूर्ण आणि एक अर्धा असे झाले आहेत. यामुळे महापालिकेत अनेक वर्षापासून प्रतिनिधीत्व करणाऱया काही घराण्याच्या पथ्यावर पडले आहे. मात्र, एक प्रभाग डोळय़ासमोर ठेवून दीड वर्ष प्रभागात फिल्डींग लावणाऱ्यांना प्रभाग रचना धक्का देणारी ठरली आहे. यापैकी काहींना 19 हजार लोकसंख्या असणारा मतदार संघ झाल्याने तलवार म्यान करावी लागणार आहे.

13 प्रभाग होणार थेट आरक्षित, अनेकांचा पत्ता कट
लोकसंख्येच्या आधारानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण काढले जाते. यामुळे 92 पैकी 13 सदस्यांचे पोट प्रभाग थेट आरक्षित होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 12 आणि 1 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असणार आहेत. या प्रभागातील काही विद्यमानसह इच्छुकांचाही पत्ता कट झाला आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार 12 मुख्य प्रभागातील प्रत्येक एक पोट प्रभाग अनुसूचित जातीसाठी आणि एक प्रभागातील एक पोट प्रभाग अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होणार आहे.

अनुसूचित जातीचे 12 प्रभाग पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक लोकसंख्या
1 4730
4 7097
13 3263
19 5374
30 7518
28 2993
21 2457
29 2993
20 2272
18 2579
7 2829
9 2929

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग क्रमांक -2

जुने 15 ते 20 प्रभाग फुटले

महापालिकेच्या जुन्या प्रभाग रचनेनुसार 81 प्रभाग होते. नवीन प्रभाग रचनेमध्ये जुन्या प्रभाग रचनेतील दोन प्रभाग पूर्ण आणि एक प्रभाग अर्धा असा 19 हजार लोकसंख्येचे झाले आहेत. यानुसार 15 ते 20 जुने प्रभाग फुटले असून हा विद्यमान नगरसेवकांना धक्का आहे.

30 प्रभाग 3 सदस्यीय, एक प्रभाग 2 सदस्यीय

31 वॉर्ड आणि 92 सदस्य अशी प्रभाग रचना आहे. यामध्ये 30 प्रभागात प्रत्येकी 3 आणि एक प्रभागात दोन सदस्यीय असणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 30 त्रिसदस्यीय तर प्रभाग क्रमांक 31 दोन सदस्यीय आहे.प्रभाग क्रमांक 9 सर्वाधिक मोठा प्रभाग
31 प्रभागात लोकसंख्येने सर्वांत मोठा प्रभाग हा प्रभाग क्रमांक 9 हा आहे. या प्रभागाची लोकसंख्या 19 हजार 949 इतकी आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 20 हा 19717 आणि प्रभाग क्रमांक 18 हा 19416 लोकसंख्येचा आहे. सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग हा प्रभाग क्रमांक 31 आहे. या प्रभागाची लोकसंख्या 12775 इतकी आहे. उर्वरीत बहुतांश प्रभाग हे 15 हजार ते 19 हजार लोकसंख्येच्या दरम्यानचे आहेत.

Related Stories

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Anuja Kudatarkar

आटपाडीतील दोन तलावांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी

Abhijeet Khandekar

शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन प्रयत्न

Abhijeet Khandekar

शिरोडा-वेळागर येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

Anuja Kudatarkar

काळम्मावाडी धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून पाणी विसर्ग सुरु

Abhijeet Khandekar

दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या आदेशाची होळी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!