Tarun Bharat

प्रांत कार्यालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या सुटणार

प्रतिनिधी/ सातारा

प्रांत कार्यालयाच्या आवारात हल्ली वाहतूकीची कोंडी एवढी निर्माण होत आहे की प्रांत मिनाज मुल्ला आणि तहसीलदार आशा होळकर यांच्याच गाडय़ा लावण्यास जागा नसते. त्यामुळे आता त्यांच्या वाहनाकरता पार्किंग ट्रक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बांधकाम विभाग कामाला लागले आहे. मात्र, या परिसरात ज्या पकडून आणलेल्या गाडय़ा, जेसीबी, बोट आहे. त्यामुळे जागा व्यापली गेली आहे. अगोदर ते हटवा मग वाहतूकीची समस्या सुटेल अशी अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. येत्या काही दिवसात येथे पापिंग ट्रक तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

अलिकडच्या काही दिवसामध्ये प्रांत कार्यालयाच्या आवारात वाहनांची तोंबा गर्दी होताना दिसत आहे. ही वाहने कशीही कुठेही उभी केली जातात. चार चाकी वाहन आत आणणे तर मुश्किल बनले आहे. त्यामुळे प्रांत आणि तहसीलदार यांची वाहने आतमध्ये आतमध्ये आणणे अतिशय अडचणीचे बनले आहे. चालकही त्रासत असल्याचे अनेकांच्या तेंडून चर्चा ऐकली. तसेच प्रांत आणि तहसीलदार यांच्या गाडीच्या जागेवर अन्यच गाडया उभ्या असतात. तसेच कारवाई केलेली वाहनेही या परिसरात कशीही उभी आहेत. त्यामुळे परिसर कमी आणि वाहनांची संख्या जास्त झाली आहे. त्याकरता प्रांत आणि तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार  बांधकाम विभागाकडून पार्किग ट्रक तयार करण्याच्या कामापूर्वी मोजमापे घेण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात हे काम होण्याची शक्यता आहे. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता त्यास पुष्टी देण्यात आली.

 

Related Stories

फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला अन्…

datta jadhav

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ३ हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Archana Banage

बाणगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Archana Banage

सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाट

Patil_p

कराडमध्ये महिलेला भामटय़ांकडून गंडा

Patil_p

सत्ताधाऱयांकडून फेरीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Patil_p