Tarun Bharat

प्राचार्य फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचा समारोप

बेळगाव : वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी कलादालनात भरलेल्या प्राचार्य जे. बी. फडके यांच्या चित्रप्रदर्शनाचा सांगता समारोप झाला. याप्रसंगी वरेरकर नाटय़ संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे, चित्रकार भरत जगताप व शिवाजी बेकवाडकर आदी उपस्थित होते.

‘कोरोना काळातील मोकळय़ा वेळेचा सदुपयोग करून जवळजवळ शंभर पेंटिंग्ज तयार केली. ती चित्ररसिकांसमोर मांडण्याची संधी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीने मला दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे’, असे जे. बी. फडके म्हणाले.

समारोपप्रसंगी जगदीश कुंटे म्हणाले, ‘या प्रदर्शनापासून प्रेरणा घेऊन अनेकानेक चित्रकारांनी आपली कला रसिकांसमोर मांडावी’. शोभा फडके यांनी आभार मानले.

याप्रसंगी रमेश रायजादे, मेजर सदानंद शेळके, आशा कुलकर्णी तसेच अनेक चित्ररसिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

गांधीनगरजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त

Patil_p

तुरमुरीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

ऑनलाईनमुळे पासपोर्ट काढणे झाले सुलभ

Amit Kulkarni

सलग दुसऱया दिवशीही दोनशेचा आकडा पार

Tousif Mujawar

कोगनोळी महामार्गावर टेम्पो पलटी

Omkar B

कंग्राळी बुद्रुकमध्ये दौडची उत्साहात सांगता

Amit Kulkarni