Tarun Bharat

प्राचिन मणकर्णिका कुंडाची जागा पुन्हा देवस्थानकडे

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील प्राचिण मणकर्णिका कुंडाची जागा आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला हस्तांतरीत करण्यात आली.

अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाज्यालगत असलेल्या मणकर्णिका कुंडाची  जागा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीची आहे. 1957 मध्ये कोल्हापूर महापालिकेने पब्लिक गार्डन विकासाच्या नावे देवस्थान समितीकडून जागा 99 वर्षाच्या भाडेतत्वावर हस्तांतरीत केलीहोती.

   महापालिकेने या जागेवर बगिचा विकसित केला. पण कालांतराने येथे पे ऍन्ड यूज तत्वावर स्वच्छतागृह उभारले. अशाप्रकारे महापालिकेने भाडेतत्व कराराचा शर्तभंगही केला. देवीच्या स्नानाचे पाणी जाणाऱया मणकर्णिका कुंडाच्या ठिकाणी शौचालय उभारुन भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करुन  हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन शौचालयाचे बांधकाम पाडले. मंदिरातील मणकर्णिका कुंडाला ऐतिहासिक महत्व असल्याने हे कुंड पुन्हा भाविकांसाठी खुले करुन परिसराचा विकास केला जाणार आहे. मंदिरातील या कुंडात अंबाबाईच्या स्नानाचे तीर्थ भूमार्गाने जमा होत असल्याने भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र स्थान आहे. हा प्राचिण ठेवा देवस्थान समितीकडून जतन केला जाणार आहे. गेली 62 वर्षे ही जागा महापालिकेच्या ताब्यात होती. दरम्यान देवस्थान समिती सचिवां कडून मणकर्णिका कुंड खुले करण्याचे काम मंदिर विकासाअंतर्गत येत असून जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरीत करावी यासाठी आयुक्तांच्या कडे मागणी केलीहोती.  महापालिकेकडून जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. महापालिकेच्या महासभेत जागा हस्तांतरणावर शिक्कामोर्तब झाला. गुरूवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांच्याकडे महापालिकेचे इस्टेट प्रमुख अधिकारी प्रमोद बराले यांनी कागदपत्रे हस्तांतरित केली. यावेळी सर्वेअर सुनिल ठोंबरे, सदस्य राजू जाधव, सहसचिव शिवाजी साळवी, सुरेश देशपांडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

हारूर कोरोना रूग्णांच्या प्रथम संपर्कातील 26 जण विलगीकरण कक्षात

Abhijeet Shinde

बहिण भावाची वीण घट्ट करणार फक्त एक व्हॉटस अ‍ॅप नंबर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी, चालक जखमी

Abhijeet Shinde

कळंब्याचा हद्दवाढीला विरोध; हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत ग्रामस्थांची भूमिका

Sumit Tambekar

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात लोकांचा कल चुलींकडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!