ऑनलाईन टीम / सेऊल :
प्राचीन काळातील मगरी या दोन पायावर चालायच्या तसेच ऑस्ट्रीचसारख्या पळायच्याही, असा दावा दक्षिण कोरियात काम करणाऱ्या संशोधकांनी केला आहे. याबाबतचे पुरावे दक्षिण कोरियातील एका जीवाश्मात सापडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्राण्याच्या पायाचे ठसे कोरियातील एका तलावाकाठी सापडले असून, ते साधारण ११० ते १२० मिलियन वर्ष जुने आहेत. प्राचीन काळातील डायनोसोर सारखे मिळते जुळते याच्या पायाचे ठसे असले तरी, डायनोसोर हे पायाच्या बोटांवर जोर द्यायचे तर मगर माणसाप्रमाणे पायांचा टाचांवर जोर देत. संशोधनात सापडलेले पायाचे ठसे हे टाचांवर जोर दिलेले आहेत. त्यामुळे या मगरीच असाव्यात असा दावा करण्यात आला आहे, असे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. दिलेल्या बातमीत म्हटले आहे