Tarun Bharat

प्राणी संग्रहालयाच्या दैनंदिन महसुलात वाढ

भुतरामहट्टीत पर्यटकांचा वाढता ओढा : दररोज 50 ते 55 हजारांवर महसूल : व्यवस्थापनाला दिलासा

प्रतिनिधी /बेळगाव

भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाकडे पर्यटकांचा ओघ वाढत असून दैनंदिन 20 ते 25 हजार असणारा महसूल आता 50 ते 55 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पर्यटकांची पावले थांबल्यामुळे प्राणी संग्रहालयाचा महसूल पूर्णपणे थांबला होता. मात्र, गत दोन महिन्यांपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेल्या प्राणी संग्रहालयाकडे पर्यटकांचा कल वाढत असल्याने महसुलातही दुप्पटीने वाढ झाली आहे.

म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाचा विकास केला जात आहे. गतवषी प्राणी संग्रहालयात तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे आणि दोन कोल्हे आणण्यात आले आहेत. त्याबरोबरच हरिण, मगर व इतर विविध जातीचे पक्षीदेखील ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱया पर्यावरणप्रेमींसह नागरिकांची संख्या वाढली आहे. तसेच शाळांना दसऱयाची दहा दिवस सुटी होती. त्यामुळे 14 ऑक्टोबर रोजी दैनंदिन महसूल 55 हजार झाला होता. तर 15 ऑक्टोबर दसऱयादिवशी दैनंदिन महसूल तब्बल 1 लाख 28 हजारांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर दैनंदिन महसूल 50 ते 55 हजारांपर्यंत सुरू आहे. कोरोना काळात पूर्णपणे महसूल थांबल्याने वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता दैनंदिन महसुलात वाढ झाल्याने प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. संग्रहालयात सरकारी सुटी व शनिवारी, रविवारी पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे विकेंडला महसूलदेखील वाढत आहे. त्यामुळे नोकरदार व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी-रविवारी प्राणी संग्रहालय खुले ठेवण्यात येत आहे.

प्राणी संग्रहालयाची वेळ

भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 9.30 ते 5.30 यावेळेत पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात येत आहे. तसेच शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीदेखील प्राणी संग्रहालय खुले ठेवण्यात येत आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षाखालील लहान मुलांसाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे.

Related Stories

नियंत्रण सुटून ट्रक शिरला थेट फार्महाऊसच्या आवारात

Amit Kulkarni

शेतकऱयांनी मोबाईल ऍपवर पीक नोंद करावी

Patil_p

मजगावात सभामंडपाची पायाखोदाई

Omkar B

क्रीडांगण होऊ देणार नाही

Amit Kulkarni

दुकानांवरील फलकांवर कोणत्याही भाषेची सक्ती नको

Omkar B

नंदगड येथे दौडला उदंड प्रतिसाद

Amit Kulkarni