Tarun Bharat

प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव अंतर्गत हिवताप जनजागरण मोहीम

करडवाडी/प्रतिनिधी

भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव अंतर्गत’ हिवताप जनजागरण जून 2020 ही मोहीम ग्रामपंचायत करडवाडी, पाचर्डे, पारदेवाडी, निष्णप, या गावात राबवण्यात आली. आरोग्य विभागच्या कर्मचाऱ्यानी घरोघरी भेटी देऊन नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, आदी आजाराविषयी मार्गदर्शन केले. घरातील पाणीसाठे, परिसर स्वच्छता राखणे बाबत ग्रामस्थांना आवाहन करणेत आले. गावातील सार्वजनिक विहिरी, सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या, हौद, डबके यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले यावेळी उपसरपंच सागर खतकर, सदाशिव बेलेकर, दिनेश माने, रवींद्र बुरुड, प्रकाश बुरुड, प्रकाश खतकर प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव चे वैधिकीय अधिकारी डॉ. डी. एस. मानकापे, डॉ. अनिल मिरजकर, आरोग्य सहाय्यक एस.एम.देसाई, पी .बी.हराळे, आरोग्य सेवक ए. एम. शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज अन् ……नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा

Kalyani Amanagi

सातारा : आज १४ जणांना डिस्चार्ज, ४३९ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 442 पोलिसांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी मंजूर

Archana Banage

कोल्हापूर एमआयडीसी १६ मे पासून आठ दिवस राहणार बंद

Archana Banage

”मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा”

Archana Banage