Tarun Bharat

प्राथमिक फेरी निवडणुकीत 7 भारतीय विजयी

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

अमेरिकेच्या संसदेचे सदस्यत्व प्राप्त करू पाहत असलेल्या भारतीय वंशाच्या 7 नागरिकांनी प्राथमिक फेरी निवडणुकीत विजय मिळविला आहे. या 7 जणंमध्ये दोन विद्यमान खासदार तसेच दोन महिलांचा समावेश आहे. अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय पदासह संसदेच्या प्रतिनिधिगृहासाठी निवडणूक पार पडणार आहे.

अमेरिकेत सद्यकाळात स्वतःचे उमेदवार निवडण्यासाठी सत्तारुढ रिपब्लिकन पार्टी आणि विरोधी डेमोक्रेटिक पार्टीमध्ये प्राथमिक फेरी निवडणूक घेतली जात आहे. या अंतर्गत निवडणुकांमध्ये विजय मिळविणाऱया नेत्यालाच दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळते.

कॅलिफोर्नियात डॉ. एमी बेरा आणि रो खन्ना यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळविला आहे. दोघेही डेमोक्रेटिक पार्टीचे खासदार आहेत. प्रतिनिधिगृहात सर्वाधिक काळ कार्यरत असलेल्या त्या भारतीय वंशाच्या खासदार आहेत. पाचव्या कार्यकाळासाठी त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर खन्ना तिसऱयांदा प्रतिनिधिगृहात स्थान मिळवू पाहत आहेत.

रो खन्ना यांना भारतीय वंशाचे नागरिक रितेश टंडन यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. रितेश हे रिपब्लिकन पार्टीच्या प्राथमिक निवडणुकीत दुसऱया स्थानावर राहिले आहेत. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार पहिल्या दोन दावेदारांची नावे नोव्हेंबरमध्ये पार पडणाऱया निवडणुकीतील मतपत्रिकेवर नमूद असतील.

कॅलिफोर्नियाच्या 11 व्या संसदीय जिल्हय़ात रिपब्लिकन नेत्या निशा शर्मा यांनी प्राथमिक फेरीतील निवडणुकीत विजय मिळविला आहे. निशा शर्मा यांच्यासमोर डेमोक्रेटिक उमेदवार मार्क डीसोलनियर यांचे आव्हान असेल. कॅलिफोर्नियाच्या 18 व्या संसदीय जिल्हय़ात डेमोक्रेटिक नेते ऋषि कुमार प्राथमिक निवडणुकीत दुसऱया स्थानावर राहिले आहेत.

भारतीय वंशाच्या मंगा अनंतमूल यांनी व्हर्जिनियाच्या 11 व्या संसदीय जिल्हय़ातील प्राथमिक फेरी निवडणुकीत यश मिळविले आहे. मंगा अनंतमूल 6 वेळा डेमोक्रेटिक खासदार राहिलेल्या गेरी कोनोली यांना आव्हान देणार आहेत. तर प्रिस्टन कुलकर्णी यांनी टेक्सासच्या 22 व्या संसदीय जिल्हय़ात मोठा विजय मिळविला आहे. प्रिस्टन हे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार असतील.

Related Stories

बांगलादेशने निभावली मैत्री, श्रीलंकेकडून निराशा

Amit Kulkarni

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 7 लाखांचा टप्पा

datta jadhav

पोलंडमध्ये आढळला ‘वॅम्पायर’चा सांगाडा

Patil_p

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील बारमध्ये गोळीबार, १४ जणांचा मृत्यू

Archana Banage

अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; आणीबाणी लागू

datta jadhav