Tarun Bharat

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत दोन्ही पँनेलला समान जागा

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

           मागील अनेक दिवसांपासून लक्ष लागलेली प्राथमिक शिक्षक संघटनेची निवडणूक अखेर मंगळवारी पार पडली . शहर व ग्रामीण या दोन्ही विभागांमध्ये चुरशीचे मतदान झाले होते . या निवडणुकीत शहर विभागातून प्रगतीपर पॅनेलला 7 तर गुरुस्पदन पॅनेलला 7 जागा मिळाल्या. रात्री उशीरापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर विजय घोषित करण्यात आला . यामुळे विजयी पॅनलच्या सदस्यांनी गुलालाची उधळण  करून जल्लोष केला.

          सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली . शहर विभागासाठी विश्वेश्वरय्या नगर येथील सरकारी कन्नड शाळा क्र . 26 येथे मतदान प्रक्रिया पार पडली . तर ग्रामीण भागासाठी चव्हाटगल्ली येथील शाळा क्र . 5 मध्ये मतदान झाले . सायंकाळी 5 नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली . चुरशीचे मतदान झाल्यामुळे रात्री उशीरापर्यंत निकालाची उत्क?ठा लागली होती . शहर विभागातून 700 तर ग्रामीण मधून 14 9 3 मतदार होते शहर विभागामध्ये प्रगतीपर पॅनेलच्या 5 पुरुष तर 2 महिला विजयी झाल्या. गुरूस्पंदन पॅनेलमधून 4 महिला व 3 पुरुष सदस्यांनी विजय मिळविला. समसमान जागा मिळाल्याने कोणत्याही एका गटाला वर्चस्व राखता आले नाही. त्यामुळे विजयी होऊनही सदस्यांचा हिरमोड झाला.

  दोन पॅनेल आमने सामने

प्राथमिक शिक्षक संघटनेवर आपलेच वर्चस्व असावे यासाठी प्रगतीपर व गुरू स्पंदन या दोन्ही पॅनेलकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती . गावोगावी , घरोघरी जाऊन प्रचार यात आला होता . यामुळे यावेळीची निवडणुक प्रति÷sची ठरली . कोणते पॅनेल संघटनेवर वर्चस्व ठेवणार याची चर्चा शिक्षकांमध्ये होती . त्यामुळेच दोन्ही मतदान केंद्रांवर दोन्ही पॅनेलचे सदस्य जातीनिशी उपस्थित होते .

 यावेळी प्राथमिक शिक्षक संघाची निवडणूक प्रतिथेची झाली. त्यामुळे मतमोजणीही प्रक्रिया लांबली. तालुका विभागाची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. निकाल पाहण्यासाठी शिक्षकांची उत्क?ठा वाढली होती.

Related Stories

येळ्ळूर परिसरात बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण-वितरण

Amit Kulkarni

किसान सन्मानसाठी ई-केवायसी बंधनकारक

Amit Kulkarni

तालुक्मयात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष

Amit Kulkarni

कोरोना रुग्णांची वाहतूक करणारी रुग्णवाहिका उलटली

Patil_p

कपिलेश्वर मंदिरामध्ये लाकंदची आरास

Patil_p

आदर्शनगर येथे पुन्हा गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया

Amit Kulkarni
error: Content is protected !!