Tarun Bharat

प्रायोगिक लसीकरण उद्यापासून

Advertisements

तिसऱ्या टप्प्यासाठी दहा दिवसात एक हजार जणांची होणार सीपीआरमध्ये नोंदणी

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

जिल्ह्यात भारत बायेटेकच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरणाला मंगळवारी सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील एक हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. दहा दिवसांत १ हजार जणांची नोंदणी अन् लसीकरण होणार आहे. कोव्हॅक्सिन लसीकरणासाठी दोन स्वतंत्र खोल्या तयार केल्याची माहिती सुत्रांनी रविवारी दिली.

जिल्ह्यात वर्षअखेरीस कोरोना साथ बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. कोरोना रूग्ण कमी झाल्याने कोरोना केअर सेंटर, हेल्थ सेंटर हळूहळू बंद झाली आहेत. जिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा, सेवा रूग्णालयांत कोरोना ओपीडी सुरू आहे. पण तेथेही संशयित रूग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना सक्रीय रूग्णसंख्या ७५ पर्यंत खाली आली आहे. कोरोना रूग्ण कमी झाले असले तरी मास्कसंदर्भातील दंडात्मक कारवाई सुरूच आहे.

कोरोना नियंत्रणासाठी मास्क, सॅनिटायझेशन आणि हातांची स्वच्छता यावर प्रशासन, आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यातूनच कम्युनिटी स्प्रेडनंतरही ऑक्टोबरमध्ये बऱयाच प्रमाणात आरोग्य विभागाला नियंत्रण आणणे शक्य झाले. कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये आता पूर्ण क्षमतेने नॉन कोरोना रूग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. कोरोना संशयित रूग्णांपेक्षा नॉन कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय हॉस्पिटल ७५ टक्के नॉन कोरोना रूग्णांसाठी खुली करण्याची मागणी वाढत आहे.

`कोरोना’वरील कोव्हॅक्सिन लसीकरणास जानेवारीत सुरूवात होणार आहे. शासनाने ६ कंपन्यांच्या कोव्हॅक्सिनची तयारी ठेवली आहे. कोणती कोव्हॅक्सिन कोणत्या भागात येणार, हे अनिश्चित आहे. त्यामुळे रूग्णांसाठीच्या आचारसंहितेची प्रतीक्षा आहे. कोरोना योद्धे, वैद्यकीय स्टाफ, लस घेणाऱयांसाठी काही सुचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भात अद्यापी स्थानिक स्तरावर आचारसंहिता दिलेली नाही. पण लवकरच यासंदर्भात निर्देश येण्याची शक्यता आहे.

गोवा येथील क्रोम कंपनीने तिसऱया टप्प्यातील कोव्हॅक्सिनच्या प्रायोगिक लसीकरणासाठी कोल्हापूरची निवड केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यासंदर्भात आरोग्य सचिवांकडे पत्रव्यवहार करून परवानगी मागितली आहे. ती मिळाली असल्याचे समजते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात १ हजार जणांना कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे. त्यासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून नोंदणी सुरू होणार आहे. १० दिवसांत १ हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. रोज १०० जणांना ही लस देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने दोन स्वतंत्र खोल्यांचे नियोजन केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दोन दिवसांत जिल्हास्तरीय बैठक
जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात लस येणार आहे. ही लस सुरूवातीला डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफला दिली जाणार आहे. त्याची यादीही आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्यांच्या कोरोना योध्द्यांची यादी पाठवली गेली आहे. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरण आणि जिल्हा स्तरावर पुढील महिन्यांत होणारे लसिकरण याबाबत नेमके कोणते लसीकरण होणार हा संभ्रम होता, पण तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक लसीकरणाला सोमवारी सीपीआरमध्ये सुरूवात होत आहे. तर दोन दिवसांत होणाऱ्या जिल्हास्तरीय कोरोना आढावा बैठकीत जानेवारीत होणाऱ्या लसीकरणासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

जयसिंगपूर बाजार समितीमध्ये रेशीम कोष बाजारपेठ सुरू होणार

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव येथे शिवसेनेच्या वतीने चीनी हल्ल्याचा निषेध

Abhijeet Shinde

राजकीय हालचाली गतिमान होणार:करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींचे ओबीसी आरक्षण सोडत २९ जुलैला

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : करूळ घाटात ट्रकचा भीषण अपघात

Abhijeet Shinde

आयसोलेशन चौक ते आर के नगर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणासाठी जागेची आखणी

Abhijeet Shinde

शुभेच्छांचा वर्षाव अन् जीवनचरित्रास उजाळा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!