Tarun Bharat

प्रा. जी. के. खडबडी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

प्रतिनिधी / बेळगाव

पर्यावरणप्रेमी प्रा. जी. के. खडबडी यांच्या दोन कन्नड पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. ‘परिसर प्रज्ञे’ व ‘परिसर कनसगळू’ या दोन पुस्तकांचे कारंजी मठाच्या सभागृहात प्रकाशन झाले. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी व नागनूर येथील रुद्राक्षीमठाचे डॉ. अल्लमप्रभू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. निर्मल भट्टद यांनी परिचय करून दिला. सध्या पर्यावरणाच्या समस्या जाणवू लागल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत गुरुसिद्ध महास्वामीजींनी व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ट साहित्यिक बी. एस. गवीमठ, संकेश्वर येथील साहित्यिक एल. व्ही. पाटील, ए. ए. सनदी, शोभा पाटील, पुस्तकाचे लेखक प्रा. जी. के. खडबडी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Related Stories

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशीही पाच हजाराहून अधिक नवीन रुग्ण

Archana Banage

खड्डय़ांची डागडुजी करण्याऐवजी रस्त्यावरच मातीचा ढिगारा

Amit Kulkarni

शहरातील आरओ प्लांट ठरले कुचकामी

Amit Kulkarni

नवहिंदतर्फे दिनदर्शिका प्रकाशन समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

किणये रस्त्याला केवळ पॅचवर्कचा मुलामा

Amit Kulkarni

खानापुरात भीषण अपघात दोन ठार

mithun mane