Tarun Bharat

प्रिन्स फिलीप यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ऑनलाईन टीम / लंडन : 

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्यावर आज (दि.17) ब्रिटनमधील विंडसर कॅसल परिसरातल्या सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अंत्यविधीसाठी 30 लोकचं सहभागी होणार आहेत. 

9 एप्रिलला वयाच्या 99 व्या वर्षी विंडसर कॅसल येथे प्रिन्स फिलीप यांचे निधन झाले. फिलीप यांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या जॅग्वार लँड रोव्हर गाडीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल आणि ते विंडसर कॅसलमधून जवळच असलेल्या सेंट जॉर्जेस चॅपलपर्यंत नेण्यात येणार आहे.

ग्रेनेडियर गार्ड्सच्या बँड पथकाच्या मागे हिरव्या रंगाच्या जॅग्वार लँड रोव्हरमध्ये फिलीप यांचं पार्थिव असेल. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता देशभरात मिनिटभराचं मौन पाळण्यात येईल. या मौनाच्या सुरुवातीस आणि अखेरीला ब्रिटनमधील 9 ठिकाणांहून आणि जिब्राल्टरमधून तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर अंत्यविधीला सुरुवात होईल. 

Related Stories

बनावट लसींचा बाजार

Patil_p

युक्रेनवरील हल्ल्याची लेबनॉनकडून निंदा

Patil_p

आम्ही दहशतीची बीजे पेरली

Patil_p

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 12 लाखांवर

datta jadhav

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांचे निधन?

Patil_p

फिनलंडमध्ये उजव्या विचारसरणीचा पक्ष विजयी

Patil_p
error: Content is protected !!