ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. सत्ताधारी भाजप आपली सत्ता कायम राखण्यासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षही भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रणनीती आखात आहेत. खास करून प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये चांगल्याच सक्रिय झाल्या असून सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उत्तर परदेशाती कायदा आणि सुव्यवस्थेच्या वक्तव्यावर टीका केली.
दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. नेत्यांच्या उत्तर प्रदेशमधील भेटी वाढल्या असून काँग्रेस, भाजपासह इतर पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. यातच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील काही गुन्ह्यांच्या घटनांवरून निशाणा साधला आहे. प्रियांका गांधी यांनी शाहांच्या वक्तव्याचा समाचार घेत अमित शाह ‘दागिने घालून निघण्याचा जुमला’ देतात, पण हे फक्त राज्यातील महिलांनाच माहीत आहे की त्यांना त्यांना दररोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, असे ट्विट करत निशाणा साधला.
प्रियंका गांधी य़ांनी ट्विटकेले की, “देशाचे गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, परंतु रोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते हे फक्त यूपीच्या महिलांनाच माहीत आहे. म्हणूनच ‘मी एक मुलगी आहे, मी लढू शकते’ हे या राज्यात आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा राजकारणात आणि सुरक्षेशी संबंधित धोरणे बनवण्यात सहभाग वाढेल.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, आज १६ वर्षांची मुलगी देखील रात्री १२ वाजता दागिने घेऊन यूपीच्या रस्त्यावरून फिरू शकते, एवढं हे राज्य सुरक्षित आहे. शाह यांच्या याच वक्तव्यावरून प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे.