गांधी परिवारासोबतचे 4 पिढय़ांचे संबंध तुटले
वृत्तसंस्था /लखनौ
गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले कमलापति त्रिपाठी यांच्या परिवाराचे काँग्रेसशी असणारे नाते संपुष्टात आले आहे. कमलापति त्रिपाठी यांचे पणतू ललितेशपति यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांचे निकटवर्तीय राहिलेले ललितेशपति यांनी पक्षाकडून सातत्याने दुर्लक्षित केले जात असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ललितेशपति यांनी काँग्रेस सोडल्याने पूर्वांचलमध्ये पक्षाला मोठा झटका बसला आहे. मिर्झापूरच्या मडिहान विधानसभा मतदारसंघात ते 2012-2017 पर्यंत आमदार राहिले आहेत. 2019 मध्ये काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 10 सप्टेंबर रोजी प्रियंका वड्रा लखनौ दौऱयावर असताना ललितेशपति यांनी त्यांची भेट घेतली होती. अनेक दशकांपासून त्रिपाठी परिवाराचे काँग्रेसशी असलेले संबंध ललितेश यांच्या राजीनाम्यामुळे तुटले आहेत.