Tarun Bharat

प्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

 प्रियदर्शनी मोरे यांनी शेतकरी कुटूंबातून शिक्षण घेऊन जि.प.च्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी कोल्हापूर जि.प.ला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवून दिला आहे. पण स्वयंघोषित कारभाऱयांनी मंगळवारी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनामध्ये मोरेंना अपमानित केले. या प्रवृत्तीचा निषेध करतो. यापुढे कारभाऱयांकडून अशा घटना होणार नाहीत याबाबत गंभीरपणे नोंद घ्यावी, या मागणीचे निवेदन जि.प.चे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांना बुधवारी दिले.

निवेदनात म्हटले आहे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ही संकल्पना संपूर्ण राज्यस्तरावर राबविली जात आहे. महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अधिकारी महिलेचा अपमान म्हणजे जिह्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. मोरे यांना अपमानित करून बदलीची भिती घालण्यापूर्वी त्यांनी त्यांची राजकीय कौटूंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यावी. त्यांच्या मातोश्री माजी जि.प.सदस्या होत्या. तर खासदार धैर्यशील माने यांना निवडूण आणण्यामध्ये त्यांचे वडील चंद्रकांत मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना बदलीची भिती घालणे म्हणजे पदाधिकारी अकार्यक्षम आहेत काय ? असा प्रश्न निर्माण होतो. कार्यालयीन कामासाठी पदाधिकाऱयांनी या कारभारी मंडळींची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे काय ? याचेही उत्तर द्यावे. जि.प.विरोधी पक्षनेता म्हणून या घटनेचा आणि प्रवृत्तीचा निषेध करतो, असे निवेदनात नमूद आहे.

मतदानाचा अधिकार नसलेले विरोधी पक्षनेते कसले ?

अधिकाऱयांच्या मनमानी कारभारावर कोणाचे तरी नियंत्रण हवे. त्यांच्या अनियंत्रित कारभारावर नियंत्रण ठेवले, तर त्यामध्ये गैर काय ? असा सवाल उपस्थित करत ज्यांना सभागृहात मतदानाचा अधिकार नाही ते विरोधी पक्षनेते कसले ? असा प्रश्नही पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित केला. तर माझे सदस्यपद कायम असून विरोधी पक्षनेता म्हणून जिल्हा प्रशासनाकडे माझी नोंद आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार नसला तरी माझ्या कोणत्याही पदाला अद्याप धक्का पोहोचलेला नाही, असे विजय भोजे यांनी स्पष्ट केले.

 अध्यक्ष, उपाध्यक्षांना दूर ठेवून स्वतः राष्ट्रीय पुरस्कार स्विकारणे चुकीचे

कोल्हापूर जिल्हा परिषदेस केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छता दर्पण 2020 या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.12 जानेवारी 2020 रोजी पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली होती. तरीही या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांना या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना न देता स्वतः पुरस्कार स्विकारला. वास्तविक या कामाचे श्रेय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे आहे.  पण मोरे यांनी पदाधिकाऱयांना दूर ठेवून हा पुरस्कार स्विकारला. याबाबत त्यांना जाब विचारला असता या प्रकरणास भावनिक रंग देऊन त्यांनी आपल्या कर्तव्य कसुरीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

Related Stories

स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना आरोग्य सुविधा द्या : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर- मुंबई विमानसेवा ऑक्टोबरमध्येच

Abhijeet Shinde

म्हासुर्लीत घराला आग लागून साडेआठ लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

नंदगाव येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळेच शेतक-यांची आर्थिक प्रगती : चंद्रकांत निऊंगरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!