Tarun Bharat

प्रियांकाकडून नवा होमवेयर ब्रँड

Advertisements

अभिनेत्रीचा अमेरिकेत नवा व्यवसाय

प्रियांका चोप्राने नवी होमवेयर लाइन ‘सोना होम’ सादर करत अमेरिकेत एक स्थलांतरित असण्याबद्दल स्वतःची भूमिका मांडली आहे. सोना होमद्वारे मी भारतीय वारशाला अमेरिकेच्या घरांमध्ये स्थान मिळवून देऊ इच्छिते असे तिने म्हटले आहे.

सोना होम आमच्या संस्कृतीशी निगडित आहे. भारतीय संस्कृती लोकांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी ओळखली जाते. कुटुंब आणि मित्रांना एकत्र ठेवणारी ही संस्कृती आणि भारतातून येथे स्थलांतरित झल्याने माझ्यासाठी एक स्थलांतरित म्हणून हे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रियांकाने म्हटले आहे.

मी माझा मूळ देश सोडून आले, परंतु अमेरिकेत मला मित्र, कुटुंब आणि अन्य लोक भेटले. मी माझ्या देशाच्या वारशाला अमेरिकेच्या घरांपर्यंत पोहोचू शकते ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे तिने सांगितले आहे.

प्रियांकाने अलिकडेच स्वतःची आगामी सीरिज ‘सिटाडेल’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तिच्याकडे ‘एंडिंग थिंग्स‘ आणि ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ यासारखे प्रोजेक्ट्स आहेत. प्रियांका याचबरोबर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात कॅटरिना कैफ तसेच आलिया भट्टसोबत दिसून येणार आहे.

Related Stories

… अन् जेठालाल थिरकला

Patil_p

ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

Patil_p

कबीर बेदींच्या आत्मकथेचे सादरीकरण

Patil_p

…म्हणून अमिताभ बच्चन यांना आंनदाश्रू झाले अनावर

Rohan_P

घानी चित्रपटात तमन्ना भाटिया

Patil_p

‘गिल्टी माइंड्स’चा ट्रेलर प्रदिर्शत

Patil_p
error: Content is protected !!