Tarun Bharat

प्रियांका गांधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

उत्तर प्रदेशात काँगेस महासचिव प्रियांका गांधी काँगेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. स्वतः प्रियांका गांधी यांनीच तसे अप्रत्यक्षरित्या सूचित केले आहे. मात्र, त्या विधानसभा निवडणूक लढविणार की नाही यासंबंधी त्यांनी किंवा पक्षाने कोणतेही भाष्य केलेले नाही. शुक्रवारी येथे काँगेसने युवकांसाठीचे वचनपत्र प्रसिद्ध केले. त्याप्रसंगी गांधी यांना काँगेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘माझा चेहरा तुम्हाला दिसतो आहे ना,’ असे उत्तर दिले. यावरुन त्याच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे. युवकांसाठीच्या वचननाम्याचे अनावरण राहुल गांधी यांनी केले. हे पोकळ शब्द नाहीत. काँगेसला सत्ता मिळाल्यास या वचनपत्राचे क्रियान्वयन केले जाईल. युवक हेच या देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठी हे स्वतंत्र वचनपत्र तयार करण्यात आले आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

आम्ही द्वेष पसरवत नाही. आम्ही लोकांना एकत्र करतो. युवकांच्या शक्तीचा उपयोग करुन आम्हाला नवा उत्तर प्रदेश घडवायचा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. रोजगार हा राज्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तो सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केली.

Related Stories

गंगासागरमध्ये राजकीय स्थिती बदलतेय

Amit Kulkarni

केंद्र सरकारच्या दट्टय़ामुळे 700 ट्विटर खाती बंद

Patil_p

दिल्लीत गेल्या 24 तासात 340 नवे कोरोना रुग्ण; 04 मृत्यू

Tousif Mujawar

युद्धाच्या तयारीसाठी जलद पारदर्शक निर्णय आवश्यक

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत 24.37 टक्के तर आसामध्ये 18.40 टक्के मतदान

Patil_p

काश्मीर खोऱ्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; एकाला जिवंत पकडले

datta jadhav