Tarun Bharat

प्रियोळ मतदारसंघातील विजयोत्सव सामान्य कार्यकर्त्यांना समर्पित-गोविंद गावडे

प्रियोळ प्रगती मंचतर्फे गोविंद गावडे यांचा जैतोत्सव सोहळा : मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर यांची उपस्थिती

वार्ताहर /माशेल

विधानसभा निवडणूकीत मिळवलेले यश हे आपले एकटय़ाचे नसून संपुर्ण प्रियोळ मतदारसंघातील लढवय्या मतदारांचे आहे. ज्यानी आपल्या विजयासाठी कष्ट घेतले त्याचा शतशः ऋणी राहील अशी भावना प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी क्यक्त केली.

   प्रियोळ प्रगती मंच व प्रियोळ भाजपा मंडळातर्फे  काल शनिवारी बेतकी खांडोळा येथील बीग बी सभागृहात आयोजित प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांच्या विधानसभा निवडणूकीतील विजयोत्सव सोहळय़ात ते कार्य़कत्यांना साद घालत होते. यावेळी व्यासपीठावर फोंडय़ाचे आमदार तथा कृषि मंत्री रवी नाईक, शिरोडय़ाचे आमदार तथा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, बेतकी खांडोळाचे जि. प. सदस्य श्रमेश भोसले, सरपंच दिलीप नाईक, केरीच्या सरपंच अनिशा नाईक, भाजपाचे ऍड. मनोहर आडपईकर, सर्वेद्र फडते उपस्थित होते.

विकासकामानंतरही गोविंदला मते कमी दिल्याची खंत-रवी नाईक 

यावेळी बोलताना मंत्री रवी नाईक म्हणाले राजकारण्य़ांनी आपल्या मतदारांना लाचार न बनविता आत्मनिर्भर बनविण्यासाठी भर द्यावा. उच्च शिक्षणांच्या आधारे स्वावलंबी बना, औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळवा. युवकांनी रोजगार मिळवून आत्मनिर्भर व्हावे असा संदेश दिला. गोविंद गावडे हे धडाडीचे नेते असून विकासकामातून प्रियोळचा कायापालट केलेल्या नेत्याशी प्रियोळचे मतदारांना योग्य तेवढी साथ न दिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकनिष्ट राहिलेल्या कार्यकर्त्यानी भविष्यात बहुजन समाजाचे नेते गोविंद गावडे यांच्या पाठिशी सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन केले. सुभाष शिरोडकर म्हणाले की गोविंद गावडे यांच्या जैतोत्सवात उसळलेली गर्दीचा माहोल हेच गोविंद गावडे यांनी प्रियोळ मतदारसंघातून मिळवलेले प्रेम आहे. असा जनाधर मिळणे हीच एका लोकप्रतिनिधी कमावलेली सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगत कमी अवधीत गोविंद गावडे यांनी कमावलेल्या जनाधाराबाबत कौतुगोद्गार काढले.     यावेळी निवडणूकीत काळात मतदारसंघ पातळीवर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. त्याशिवाय व्हीडीओच्या माध्यमातून शार्ट फिल्म बनविणाऱया कलाकारांना, तसेच मंत्री गावडे यांच्या विजयोत्सवात सहभागी झालेल्य़ा कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात आला. मंत्री गावडे यांच्याहस्ते प्रियोळ मतदारसंघातील त्याच्या असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत केक कापून विजयोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या नेत्याच्या जैतोत्सव सोहळय़ाला प्रियोळ मतदारसंघातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहित खांडेकर यांनी केले.

Related Stories

मंत्री जेनिफ्ढर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत रोजगार विषयावर सीआयआयची बैठक

Omkar B

राज्याची आर्थिक स्थिती बिकट

Omkar B

उघडय़ावर कचरा टाकणाऱया दुकानदारावर कारवाई

Omkar B

गोव्याचे 100 कोटीचे कर्जरोखे विक्रीस

Patil_p

भ्रमणध्वनी, दागिने चोरणाऱया बंगाली चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni

कीर्तनातून सुसंस्कृत पिढी घडते

Patil_p