Tarun Bharat

प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर`सीईटी’ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

7 मार्च पर्यंत अंतिम मुदत

प्रतिनिधी / कोल्हापूर

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व तयारीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 7 मार्चपर्यंत आहे. 13 मार्च रोजी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत अभिरूप चाचणी (मॉक टेस्ट) होणार आहे. शनिवार 20 मार्च रोजी सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा होईल.

राज्यातील सहा प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) एकसूत्रता आणण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. नुकतेच राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेने सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भातील जाहिरात प्रसिध्द केली आहे. प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 7 मार्च आहे. 13 मार्च रोजी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत अभिरूप चाचणी (मॉक टेस्ट) होणार आहे. शनिवार 20 मार्च रोजी सायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा होईल.

त्यानंतर 28 मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल. उमेदवारांना लेखी परीक्षेचे 200 गुण व मुलाखतीचे 50 गुण असे लेखी आणि तोंडी परीक्षेचे एकत्रित गुण करून मिळणाऱया गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. मुलाखतीची तारीख, वेळ लेखी परीक्षेनंतर कळवली जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती … या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती कोल्हापूर प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी दिली आहे.

Related Stories

पोस्ट ऑफिसमधून मिळणार बँक खात्यातील आधारव्दारे पैसे

Archana Banage

Kolhapur; शहरातील नाले गेले कुठे ? सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची महापालिका प्रशासनाला विचारणा

Abhijeet Khandekar

…नाहीतर घरं-दारं विकायची वेळ येईल, चंद्रकांत पाटलांचा केंद्रासह-राज्याला सल्ला

Archana Banage

कोल्हापूर : संसर्गित डॉक्टरांसाठी ‘स्पेशल’, कर्मचाऱयांसाठी ‘जनरल’ वॉर्ड

Archana Banage

Good news : इलेक्ट्रिक वाहनात 300 टक्के वाढ,सरकारी ताफ्यातही 50 लाख इलेक्ट्रिक वाहने येणार

Archana Banage

जुन्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जागी शाहू-आंबेडकर स्मारक उभारा

Archana Banage