Tarun Bharat

प्रुझर-इंडिका अपघातात महिला ठार

Advertisements

प्रतिनिधी/ संकेश्वर

भरधाव इंडिकाने जोराची धडक दिल्याने पुझर उलटून झालेल्या अपघातात महिला ठार तर 23 जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास व्हन्नोळी फाटय़ानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला. मायव्वा बसवाणी रक्षी (वय 70 रा. कुन्नूर-हिडकल डॅम ता. हुक्केरी) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना बेळगावच्या शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर संकेश्वर येथील समुदाय आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती, निपाणी येथील नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी हुक्केरी तालुक्यातील कुन्नूर-हिडकल डॅम येथील 24 जण सोमवारी सकाळी निपाणीला पुझरने आले होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास अंत्यविधी आटोपून ते पुन्हा कुन्नूरकडे परतत होते. दरम्यान व्हन्नोळी फाटय़ावरील धाब्यावर चहा घेण्यासाठी पुझर महामार्ग ओलांडत असतानाच मागून येणाऱया भरधाव इंडिका कारने पुझरला जोराची धडक दिल्याने पुझर उलटली. यामध्ये मायव्वा यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य प्रवासी जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना बेळगाव येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरितांवर संकेश्वर येथे उपचार करण्यात आले.

या अपघातात जोत्याप्पा सत्याप्पा गोणी, विठ्ठल कलाप्पा गोणी, गौरव्वा इरगौडा बडाई, शिवक्का सत्याप्पा बडाई, निंगाप्पा यल्लाप्पा हलकर्णी, मारुती बाबू गोणी, निंगाप्पा बाबू मगदूम, सुशिला रविंद्र घस्ती, निंगव्वा विठ्ठल मुत्यापगोळ, गोदव्वा गोपाळ घस्ती, शारव्वा लक्ष्मण मगदूम, चंपव्वा बसवाणी बडाई, दुंडव्वा विठ्ठल कणकेरी, अशोक निंगाप्पा चौगला, लकव्वा लकाप्पा कमते, गौरव्वा काशाप्पा बदे, मल्लव्वा भालाप्पा बन्यापगोळ, शांतव्वा बाबू दासनट्टी, उद्धव्वा विठ्ठल मगदूम, सत्यव्वा शिवाप्पा कमते, महादेव पुंडलिक गडकरी, सुरेश लक्ष्मण गडकरी, सिद्धव्वा मल्लप्पा मलाडी अशी जखमी झालेल्यांची नावे असून हे सर्व (रा. कुन्नूर हिडकल डॅम) येथील आहेत.

अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी आपल्या सहकाऱयांसह धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी हलविले. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.

Related Stories

ऑनलाईनद्वारे व्यवसाय परवाना नूतनीकरण सोयीचे

Amit Kulkarni

जितो लेडिज विंगचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p

संकेश्वरात सीलडाऊन अंमलबजावणी कडकच

Patil_p

अर्भकाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांचे धरणे

Omkar B

विमानाने 363 किलो व्हॅक्सिन दाखल

Amit Kulkarni

मोटारसायकली चोरणाऱया आंतरराज्य गुन्हेगाराला अटक

Patil_p
error: Content is protected !!