Tarun Bharat

प्रॅपर्ट बनली चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पंचगिरी करणारी पहिली महिला

Advertisements

वृत्तसंस्था / टय़ुरिन

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये स्टेफनी फ्रॅपर्ट ही पंचगिरी करणारी पहिली महिला ठरली आहे. या स्पर्धेतील बुधवारी युवेंट्स आणि डायनॅमो किव्ह यांच्यातील सामन्यात फ्रान्सची महिला फुटबॉल पंच म्हणून 36 वर्षीय स्टेफनी फ्रॅपर्टची नियुक्ती करण्यात आली होती.

फ्रान्सच्या फ्रॅपर्टने यापूर्वी युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील दोन सामन्यामध्ये पंचगिरी केली होती. फुटबॉल पंचगिरी क्षेत्रात तिने गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात प्रेंच फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने विविध स्पर्धांमध्ये एकूण 18 सामन्यात पंचगिरी केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या लिव्हरपूल आणि चेल्सी या दोन संघातील सुपरचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात तसेच महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही तिने पंचगिरी केली होती.

Related Stories

भारत-चायनीज तैपेई महिला फुटबॉल संघात आज लढत

Patil_p

भारतीय ऍथलीट्सच्या सराव तसेच सुरक्षेवर ऑलिंपिक आयोजकांचे लक्ष

Patil_p

आंध्रचा धुव्वा उडवित पंजाबचा पहिला विजय

Patil_p

मध्यवर्ती करार करण्यास नीशमचा नकार

Patil_p

यजमान इंग्लंडचे दुसऱया डावात चोख प्रत्युत्तर

Patil_p

शिवा थापाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p
error: Content is protected !!