Tarun Bharat

प्रोबस क्लब फोंडाच्या ज्येष्ठ नागरीकांसाठीचा क्रीडा महोत्सव उत्साहात

दुर्गाकुमार नावती, रघुवीर नाईक, गुरुदास बांदोडकर, गीता प्रभुदेसाई, शोभा पत्की यांची उल्लेखनीय कामगिरी

क्रीडा प्रतिनिधी /फोंडा

प्रोबस क्लब फोंडा व प्रोबस चॅरीटी ट्रस्टने माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठीचा क्रीडा महोत्सव बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आयोजित करण्यात आला. पुरुष गटात दुर्गाकुमार नावती, रघुवीर नाईक, गुरुदास बांदोडकर, दिगंबर कुमटेकर तर महिला गटात गीता प्रभुदेसाई व शोभा पत्की यांनी विविध क्रीडा प्रकारात पारितोषिके प्राप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केली.

60 ते 65 वर्षे वयोगट व 66 वर्षावरील पुरुष व महिला अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 66 वर्षावरील वयोगटातील पहिल्या गटात 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत रघुवीर नाईकने प्रथम तर दिगंबर कुमटेकरने द्वितीय स्थान पटकावले. दुसऱया गटात दुर्गाकुमार नावतीने प्रथम तर गुरुदास बांदोडकर यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले. महिलांच्या पहिल्या गटात रितीना पेरेराने प्रथम तर पल्लवी गुणाजीने द्वितीय स्थान पटकावले. दुसऱया गटात गीता प्रभुदेसाईने प्रथम व शोभा पत्कीने द्वितीय स्थान मिळविले. गोळाफेक स्पर्धेच्या पहिल्या गटात दिगंबर कुमटेकरने प्रथम व रघुवीर नाईकने द्वितीय स्थान प्राप्त केले. दुसऱया गटात गुरुदास बांदोडकर व दुर्गाकुमार नावती यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केले. महिला गटात शोभा पत्कीने प्रथम तर पल्लवी गुणाजी यांनी द्वितीय स्थान मिळविले. नेमबाजी स्पर्धेत प्रकाश नाईक व नरहरी नाईक यांनी तर महिला गटात गीता प्रभुदेसाई व महाले यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केले. अन्य क्रीडा स्पर्धक सुमन नाईक, शोभा पत्की, नरहरी नाईक, दुर्गाकुमार नावती, गीता प्रभुदेसाई, रितीना पेरेरा, मनोहर पाटील यांनी प्रथम स्थान तर नेहा बांदोडकर, सुकांत गुरव, प्रतिक्षा वर्टीकर, शिताली ठाकूर, महानंदू नाईक, एस. के. पाटील, प्रफुल्ल रायकर व सतीश ठाकूर यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले. पारितोषिक वितरण समारंभाला मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, प्रोबस क्लबचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, प्रोबस ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, सचिव अविनाश रामनाथकर आदी उपस्थित होते.

Related Stories

कुर्टी फोंडा महामार्गावर चार वाहनांमध्ये अपघात

Amit Kulkarni

शाळांशी संबंधीत सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक

Amit Kulkarni

राष्ट्रपती मुर्मू यांच्या ‘इफ्फी’ला शुभेच्छा

Amit Kulkarni

आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे!

Amit Kulkarni

कळंगूटमध्ये लोबो हॅट्ट्रिक साधणार की, भाजप गड राखणार

Amit Kulkarni

महिलांचा केवळ मतांसाठी वापर नको

Amit Kulkarni