Tarun Bharat

प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटण, युपी योद्धा संघांचे शानदार विजय

Advertisements

वृत्तसंस्था /बेंगळूर

आठव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील रविवारी खेळविण्यात आलेल्या 43 व्या सामन्यात अस्लम इनामदारच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटणने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सचा 39-27 असा धुव्वा उडविला. दुसऱया एका सामन्यात युपी योद्धाने बेंगळूर बुल्सवर 42-27 अशा गुणांनी एकतर्फी मात केली.

पुणेरी पलटण आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्यात पुणेरी पलटण संघातील प्रमुख रायडर अस्लम इनामदारने सुपर 10 (17 गुण) तसेच अभिनेश नादराजनने 5 गुण नोंदविले. बंगाल वॉरियर्सतर्फे कर्णधार मनिंदर सिंगने सुपर 10 गुण मिळविले. गेल्या वर्षीच्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्सने विजेतेपद पटकाविले होते. मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सवर 20-11 अशा गुणांची आघाडी मिळविली होती. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटणने पहिल्यांदा बंगाल वॉरियर्सचे सर्वगडी बाद केले. या स्पर्धेत बंगाल वॉरियर्सने गेल्या पाच सामन्यांमध्ये केवळ एक विजय नोंदविला आहे. उत्तरार्धातील खेळाच्या तिसऱया मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे दुसऱयांदा सर्व गडी बाद झाले. पुणेरी पलटणने यावेळी 12 गुणांची आघाडी मिळविली होती. कर्णधार मनिंदर सिंगने अमीत नरवालच्या मदतीने सुपर 10 गुण नोंदविले. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटणने 13 गुणांची आघाडी मिळविली होती. पुणेरी पलटणने अंतिम चढाईमध्ये महत्त्वाचे गुण घेत बंगाल वॉरियर्सचे आव्हान संपुष्टात आणले.

यूपीच्या बचावफळीची उत्तम कामगिरी

यूपी योद्धा आणि बेंगळूर बुल्स यांच्यातील सामन्यात यूपी योद्धाच्या बचावफळीची कामगिरी दर्जेदार झाली. यूपी योद्धाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात या विजयामुळे सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीकांत जाधवने सुपर 10 गुणांसह  एकूण 15 गुण नोंदविले. सामन्यातील 15 व्या मिनिटाला यूपी योद्धा संघाने पहिल्यांदा बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद केले. मध्यंतरापर्यंत यूपी योद्धाने बेंगळूर बुल्सवर 19-14 अशी आघाडी मिळविली होती.

उत्तरार्धातील खेळाच्या प्रारंभी यूपी योद्धा संघाने दुसऱयांदा बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद करून 9 गुणांची आघाडी घेतली होती. मात्र अखेर यूपी योद्धाने बेंगळूर बुल्सचा 15 गुणांच्या फरकाने पराभव केला.

आजचे सामने

1) यू मुम्बा वि. पाटणा पायरेट्स

वेळ : रात्री 7.30 वा.

2) तेलुगू टायटन्स वि. गुजरात जायंट्स, वेळ ः रात्री 8.30 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार.

प्रो कबड्डी लीग गुणतक्ता ( 9 जानेवारीअखेर)

 • क्रम   संघ                 सा    जय   हार   टाय   गुण
 • 1      दबंग दिल्ली      7     5      0      2      31
 • 2      पाटणा पायरेट्स        7      5      1      1       29
 • 3      बेंगळूर बुल्स      8     5      2      1      28
 • 4      यू मुम्बा            7     3      1      3      25
 • 5      तामिळ थलैवाज        7      2      1      4       22
 • 6      यूपी योद्धा         8     2      4      2      20
 • 7      हरियाणा स्टीलर्स       7      3      3      1       20
 • 8      जयपूर पिंक पँथर्स     7      3      4      0       18
 • 9      बंगाल वॉरियर्स  8     3      5      0      17
 • 10    पुणेरी पलटन    8     3      5      0      16
 • 11    गुजरात जायंट्स 7     1      4      2      15 12       
 • तेलुगू टायटन्स   7          0          5          2          10

Related Stories

पाकिस्तानचे पहिले पथक आज इंग्लंडला रवाना

Patil_p

विंडीज संघाची आगेकूच मालिका विजयाकडे

Patil_p

सायमन कॅटिचचा सहायक प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

भारतीय बॉक्सर्सचे ऑलिम्पिकपूर्वी विदेशात शिबिर

Amit Kulkarni

ऍश्ले बार्टी, राफेल नदालचे आव्हान समाप्त

Patil_p

सूर्यकुमार यादव मानांकनात दुसऱया स्थानी

Amit Kulkarni
error: Content is protected !!