Tarun Bharat

प्रो फुटबॉलमधील इजिप्तचा सर्वात वयस्कर फुटबॉलपटू बहादेर

वृत्तसंस्था / कैरो

जागितक व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रामध्ये पूर्ण सामना खेळणारे इजिप्तचे ग्रॅण्डफादर इझेलदिन बहादेर हे सर्वात वयस्कर फुटबॉलपटू ठरले आहेत. आपला 75 वा वाढदिवस काही दिवसांवर असताना बहादेर यांनी इजिप्तच्या थर्ड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात आपला सहभाग दर्शविला होता. बहादेर यांच्या या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनिज विश्व विक्रम रेकॉर्डस्मध्ये झाली आहे.

इजिप्तचे माजी हौशी फुटबॉलपटू 3 नोव्हेंबर रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. शनिवारी त्यांच्या फुटबॉल संघाला इल अयात स्पोर्टस् क्लबकडून 2-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात बहादेर यांनी संपूर्ण 90 मिनिटे आपला सहभाग दर्शविला. जागतिक व्यावसायिक फुटबॉलमध्ये खेळण्याचा यापूर्वी इस्त्रायलच्या 73 वर्षीय हेइक यांचा विश्वविक्रम होता. पण बहादेर यांनी हेइक यांचा विश्वविक्रम मागे टाकला.

Related Stories

इंग्लंडचा संघ सप्टेंबरात पाक दौऱयावर

Patil_p

जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियाचे नवे निवड समिती प्रमुख

Patil_p

स्नेह राणा-तानिया भाटियाची झुंजार शतकी भागीदारी

Patil_p

भारतीय हॉकी संघ ओडिशात दाखल

Patil_p

रवी दाहियाला सुवर्णपदक

Patil_p

मालिकाविजय निश्चित करण्यास भारत सज्ज

Patil_p