Tarun Bharat

प्रो. फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाची विजयी सलामी;वेळसावर विजय

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोवा फुटबॉल संघटनेच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरूवात विजयाने करताना एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने वेळसांव स्पोर्ट्स क्लबचा 2-0 गोलफरकाने पराभव केला. जीएफएच्या धुळेर मेदानावर काल हा सामना खेळविण्यात आला.

एफसी गोवासाठी आपला पहिलाच सामना खेळणाऱया जॉवियल डायस आणि मेवन डायसने संघाचे गोल केले. या विजयाने एफसी गोवा संघाला 3 गुण प्राप्त झाले. आरंभालाच वेळसाव स्पोर्ट्स क्लबने लढतीवर वर्चस्व ठेवले. त्यांच्या रोहन रॉड्रिग्सचे दोन वेळा गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. 

27व्या मिनिटाला एफसी गोवाने गोल करून आघाडी मिळविली. जॉवियल डायसने चेंडूचा ताबा घेत वेळसाव स्पोर्ट्स क्लबचा गोलरक्षक जीत गुप्ताला लिलया भेदले आणि चेंडूला जाळीची दिशा दाखविली. त्यानंतर एफसी गोवाने मध्यंतरापर्यंतच्या खेळावर आपला ताबा मिळविला. या दरम्यान त्यांच्या आयव्हन डिकॉस्ताचा फ्रिकीकवर गोल करण्याचा यत्न क्रॉसबारला आदळल्याने वाया गेला.

 मध्यंतराच्या ठोक्याला वेळसावच्या चॅडल फर्नांडिसचा हेडरवर गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकल्याने त्यांची बरोबरी साधण्याची संधी हुकली. दुसऱया सत्रात जादा वेळेतील खेळात ब्रिटो परेराच्या पासवर मेवन डायसने गोल करून एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाचा विजय अधिक सोपा केला.

Related Stories

पारंपरिक उत्सव सर्व धर्मांना एकत्रित आणण्याचे काम करतात

Amit Kulkarni

गुल्शन गुसाईविरुद्धची पुढील सुनावणी आता

tarunbharat

गॅर सिलिंडर दरवाढ म्हणजे भाजपाची चतुर्थी भेट

Amit Kulkarni

म्हापशात गुढीपाडवा उत्सव

Patil_p

सुभाष फळदेसाईंकडून सांगेतील गावागावात बैठकांचा सपाटा

Amit Kulkarni

कुडचडे – काकोडा गणेशोत्सवाच्या देणगी कूपन विक्रीस प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!