Tarun Bharat

प्रो लीग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत हॉलंड विजेता

Advertisements

वृत्तसंस्था/ रॉटरडॅम (हॉलंड)

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन प्रो लीग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद हॉलंडने (नेदरलँडस्) पहिल्यांदाच पटकाविले. रविवारी झालेल्या सामन्यात हॉलंडने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.

या स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱया हॉलंडने पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविले आहे. सदर स्पर्धेमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले आहे. रविवारच्या सामन्यात भारतातर्फे पहिल्याच मिनिटाला अभिषेकने गोल नोंदविला. हॉलंडतर्फे पाचव्या मिनिटाला जेनसेनने गोल नोंदवून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. सामन्यांच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 45 व्या मिनिटाला क्रूनने हॉलंडचा दुसरा आणि निर्णायक गोल नेंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत गुणतक्त्यात हॉलंडने आघाडीचे स्थान घेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. हॉलंडचे हे दोन सामने स्पेन बरोबर होणार आहेत. बेल्जियमने या स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले असून भारताने 30 गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे.

Related Stories

the kashmir files : विवेक अग्निहोत्रींचं शरद पवारांना उत्तर, म्हणाले…

Abhijeet Shinde

मध्यप्रदेशात 10 मजूर रस्ते अपघातात ठार

Patil_p

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी

Sumit Tambekar

नवे कायदे कृषिक्षेत्राला उद्ध्वस्त करणार

Patil_p

जाहीर प्रचारावरील बंदीसंबंधी निर्णय आज

Patil_p
error: Content is protected !!