Tarun Bharat

प्र-कुलपती कायद्यासंदर्भात विद्यापीठाने जनजागृती करावी

प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांना शिवसेनेचे निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी

कृषी विद्यापीठाचे कुलपती कृषी मंत्री आणि वैद्यकीत विद्यापीठाचे कुलपती आरोग्यमंत्री असतात. त्याप्रमाणे 2016 चा विद्यापीठ कायदय़ात बदल करून सुधारणा कायद्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना उच्च शिक्षण विद्यापीठांचे प्र-कुलपती पद दिले आहे. तरी शिवाजी विद्यापीठाने या सुधारणा कायद्यासंदर्भात जनजागृती करावी, या मागणीचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिले.

निवेदनात म्हंटले आहे, विद्यापीठ सुधारणा कायद्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्र-कुलपती असतील या वाक्याचा चुकीचा अर्ध घेवून विद्यापीठ राजकीय अड्डा बनवणार अशी अफवा काहींनी उठवली आहे. तसेच कुलगुरू यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. सुधारणा कायदा सुखदेव थोरात समितीतील अनेक शिक्षण तज्ञांनी तयार केला आहे. प्र-कुलपती महाराष्ट्रात नव्याने होत नाहीत. तर केरळ, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातील कृषी व वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्र-कुलपती पदाची तरतूद आहे. मग उच्च व तंत्र शिक्षण विद्यापीठाचे प्र-कुलपतीपदाबद्दलच का गैरसमज केला जात आहे. विद्यापीठाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीच असतात. परंतू त्यांना प्र-कुलपती केले तर राजकारण केले जाते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा कायद्यासंदर्भात जनजागृती करावी. यावेळी शिवसेना शहरप्रमुख शिवाजीराव जादाव युवा सेना प्रमुख मनजित माने आणि कार्यकर्ते होते.

Related Stories

मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत

Archana Banage

दीपावलीनिमित्त गांधीनगर बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी गर्दी; उद्यापासून वाहतूक, पार्किंगमध्ये बदल

Archana Banage

दोन आठवडयात कोल्हापूर- बेंगळूर विमानसेवा सुरू होणार- खासदार महाडिक

Abhijeet Khandekar

भाजपला राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 3 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

कोल्हापूर : बीएसएनएल’ची ढिसाळ यंत्रणा, गेली महिनाभर ना नेटवर्क.. ना इंटरनेट

Archana Banage