Tarun Bharat

प्लाझ्मा थेरपी कोरोनावरचा उपचार नाही,आवरा;केंद्राचा इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रयोगाच्या टप्प्यावर आहे. रुग्णांसाठी ती धोकादायक सुद्धा ठरु शकते असे सरकारने म्हटले आहे. दिल्लीमध्ये एका करोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग यशस्वी ठरल्याने आशा निर्माण झाली आहे.

“करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी लागू पडते याचा कुठलाही ठोस पुरावा नाहीय” असे आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले. “ही थेरपी अजूनही प्रयोगाच्या टप्प्यावर आहे. इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यावर अभ्यास करत आहे. प्लाझ्मा थेरपी काळजीपूर्वक केली नाही तर धोकादायक सुद्धा ठरु शकते” असे अग्रवाल यांनी सांगितले.मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये एका ४९ वर्षीय रुग्णावर खासगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने यशस्वी उपचार करण्यात आले. या यशामुळे अनेक जण प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे आले आहेत. मुंबईत आजपासून प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत.

काय आहे कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपी
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले.

Related Stories

‘ॲपल’ आणणार स्वतःचे ‘सर्च इंजिन’

datta jadhav

अफगाणिस्तानात अमेरिकेचे आता केवळ 300 नागरिक

Patil_p

मेलबर्न शहरात 6 आठवडय़ांची टाळेबंदी

Patil_p

कॅनडा, स्वीडनमध्येही नवा स्ट्रेन

Patil_p

भारताचे डब्ल्यूएचओकडून कौतुक

Patil_p

बांगलादेशात महागाई विरोधात जनक्षोभ

Patil_p