Tarun Bharat

प्लास्टिक टाळणे जरूरी आहे !

Advertisements

आज जगातील समुद्रांमधील 90 टक्के कचरा हा प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिकचा आहे. तीच गत जमिनीवरील कचऱयाचीही आहे. तुम्ही आजूबाजूच्या कचऱयाच्या ढिगाकडे नजर टाकली तर तुम्हाला प्लास्टिकची पिशवी चघळणारी एखादी गाय वा कुत्रा नक्कीच दिसेल. इतकंच नाही तर देवस्थानानजीक नेहमीच माकडं अशा पिशव्या पळवून नेताना दिसतात. हे असेच दुर्दैवी प्राणी असतात. मानवप्राण्याला प्लास्टिक घातक आहे हे कळत असल्यामुळे तो ते खात नाही; मात्र आपण याचा वापर अद्याप थांबवलेला नाही.

एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे पाणी किंवा मासे मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. 1950च्या सुमारास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ लागला व साठच्या दशकानंतर तो वाढतच गेला. तेव्हापासून निर्माण झालेला एकही प्लास्टिकचा तुकडा अद्याप नष्ट झालेला नाही. तो आजही तसाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तसाच पृथ्वीवर टिकून आहे. काही प्लास्टिक पिशव्या इतक्मया पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या 20 मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणाऱया पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.

शिवाय हा कचरा हटवणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. खेरीज प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा इकडून नेऊन दुसरीकडे टाकला तरी तो नष्ट करणं शक्मय नाही. त्यामुळे जगात या प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱयाचे ढिग वाढतच आहेत. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो. याच प्लास्टिक पिशवीचं विघटन होण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतात. खरं तर प्लास्टिक पिशव्यांच्या जन्मापूर्वी मनुष्य इतर प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचा आवरण किंवा थैली म्हणून उपयोग करत होता. परंतु प्राणीहत्या व निसर्गाचा नाश थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला तो आजतागायत. तो इतका वाढलाय की जणू त्यानेच आपल्याला विळखा घातलेला आहे.

पुनर्वापर, कमी वापर व पुनर्निमाण

 प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी थांबवावं यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळत आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा, यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे. या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व तितकाच पर्यावरणाला धोका पोहोचवण्याची वेळ टाळता कशी येईल हे देखील पाहिलं जातं. तसंच पिशव्या गोळा करून त्यांचं पुनर्निर्माण करून त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात 100 कोटी टन प्लास्टिक निर्माण झालं व आज एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच हे उत्पादन पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याची नोंद आहे.

 

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी

काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये भारतासह अनेक देशांचा समावेश आहे. प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी असलेल्या प्रदेशात प्लास्टिकची पिशवी वापरल्यास दंड आकारला जातो. हा दंड प्रत्येक देशात वेगवेगळा आहे. दंड आकारण्याच्या नियमानंतर काही देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं. तसंच यामध्ये पर्यावरणवादी व काही गैरसरकारी सामाजिक संस्थानी केलेल्या लोकप्रबोधनाचाही मोठा वाटा आहे.

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय

आज आपल्याकडेही छोटी छोटी गावं व शहरं पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणताना दिसत आहेत. त्याजागी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. लोकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. मॉल, मोठी दुकानं इ.सारख्या अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशवी हवी असल्यास वेगळी किंमत भरून घ्यावी लागते. यामुळे त्यांच्या वापराचं प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे. ज्यांचं जैविक विघटन शक्मय होतं. अशा पिशव्या वापरण्यासाठी अनेक देशात नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात आहे.

मायक्रॉन्सचं गणित

प्लास्टिकच्या पिशव्यांची जाडी ही मायक्रॉन्समध्ये मोजली जाते. भारतात 40 मायक्रॉन्स व जास्त जाडीच्या पिशव्या वापरल्या जातात. याचं कारण अति पातळ पिशव्यांचे तुकडे होऊन त्या जमिनीत व पाण्यात सर्वत्र मिसळतात व त्यामुळे जमिनींचा कसदारपणा नाहीसा होतो तसेच जलचरांना धोका उद्भवतो. जास्त जाडीच्या पिशव्यांचे तुकडे कमी वेगाने पडतात. तेवढाच पर्यावरणाला कमी धोका पोहोचतो.

Related Stories

प्रयत्न वाळूचे…

tarunbharat

‘हणमंतगौंड’, ‘कोलकम्मा’ ट्रस्टचे कार्य

Patil_p

पोलिस कोठडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

यशाचा पाया आत्मविश्वास

Patil_p

भक्तीच्या विठ्ठलपुरी, वसली कारापूर नगरी

Omkar B

साहित्यिक सावित्री

Patil_p
error: Content is protected !!