Tarun Bharat

‘प्लॅनेट मराठी’- महाजन पुन्हा एकत्र

Advertisements

मराठीतील पहिल्यावहिल्या ओटीटीचा मान पटकावणारे ‘प्लॅनेट मराठी’ दिलेल्या वचनानुसार प्रेक्षकांसाठी नवनवीन वेबसिरीज, वेबफिल्म, चित्रपट भेटीला घेऊन येत आहे. त्यातच आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे. लेखक, दिग्दर्शक निर्माता निखिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘रावसाहेब’ या आगामी चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर व प्लॅनेट मराठी एस. एस. प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, आणि निखिल महाजन यांनी केले आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता हा चित्रपट वन्यजीवनावर आधारित असल्याचे दिसतेय. या चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, नेहा पेंडसे बायस, जितेंद्र जोशी व महाजन यांनी केली आहे.

Related Stories

अभिनेत्री अमृता रावच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

Rohan_P

संजय जाधव यांच्या फिल्मॅजिक स्कूलचे उद्घाटन

Patil_p

‘तान्हाजी’ने जिंकला बॉक्स ऑफिसचा गड

Abhijeet Shinde

रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा

Patil_p

यशोमानला हवी अशी बायको

Patil_p

वेबसीरीजसाठी कथानकाची निवड महत्त्वाची : स्वप्निल जोशी

tarunbharat
error: Content is protected !!