Tarun Bharat

प. पू. मौनी महाराज अनंतात विलीन

प. पु. राणे महाराज मठात झाले अग्निसंस्कार

कट्टा / वार्ताहर-

सिंधुदुर्ग जिल्ह्याला देवांची भूमी म्हणून ओळखले जाते. याच देवभूमीवर अनेक साधुसंतांचा सहवास लाभला आहे. याच साधुसंतांमधील जिल्ह्यातील असंख्य भाविक भक्तगणाचे श्रद्धास्थान असलेले प. पु. मौनी महाराज यांचे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवण वायरी येथील भक्त दाजी हडकर यांच्या निवासस्थानी देहावसान झाले. त्यांचे वय सुमारे 70 वर्षे होते. देहावसान झाल्यानंतर सकाळी वराड कुसरवे येथील प. पु. राणे महाराज मठात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले. सायंकाळी 4 नंतर त्यांची विधिवत पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पूजा करून प. पु. राणे महाराज मठाच्या परिसरात भक्त दाजी हडकर यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते. अनेक भाविकांना यावेळी अश्रु अनावर झाले होते.

Related Stories

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : खेडमध्ये एटीएम कार्डद्वारे महिलेचे ५८ हजार रूपये लांबवले

Archana Banage

‘कुटुंब नियोजना’त सिंधुदुर्ग अगेसर

NIKHIL_N

पालिका कर्मचाऱ्यांच्या अभ्यास सहलीवर १२ लाख खर्च

NIKHIL_N

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे मालवणात आयोजन

Anuja Kudatarkar

कोविड अधिग्रहित खासगी रुग्णालयांचे दर जाहीर

NIKHIL_N