ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी सकाळी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये छापे टाकत अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केेली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि केरळच्या एर्णाकुलममध्ये रेड मारत ही कारवाई केली. एनआयएने सांगितले की, सर्व अटक केलेले संशयित हे दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत.
सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवले होते. राजधानी दिल्लीसह देशातील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केले जात आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केले जाऊ शकते, असेही एनआयएने म्हटले आहे.
ही टोळी मोठ्या प्रमाणात पैसे लुटण्याचे धंदे करायची. यातील काही सदस्य हत्यारे आणि गोळाबारुदांच्या खरेदीसाठी दिल्लीला येण्याची योजना आखत होते, अशी माहिती आहे. देशातील विविध राज्यात अल-कायदाचे जाळे असल्याची माहिती मिळताच अशा भागात धाड टाकण्यात आली. यानंतर अल-कायदाच्या या 9 संशयितांना अटक करण्यात आली आहे.